Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : महाकाळी येथील धाम प्रकल्प ओव्हरफ्लो; वर्धेकरांच्या पाण्याची चिंता मिटली

Wardha News : मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील छोटे आणि मोठ्या प्रकल्पांसह नाले देखील भरले आहेत.

Rajesh Sonwane

चेतन व्यास

वर्धा : सततच्या पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. वर्धा शहरासह आजूबाजूच्या अकरा ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणारा महाकाळी येथील धाम प्रकल्प शंभर टक्के भरला असून धरणातील पाणी ओसंडून वाहत आहे. यामुळे वर्धा शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाची एका भागाकडून उंची वाढविण्यात आली होती. नदीत विसर्ग सुरू झाल्याने काचनूर, खरांगणा, आंजी, मोरांगणा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील सहा दिवसांपासून (Wardha) जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील छोटे आणि मोठ्या प्रकल्पांसह नाले देखील भरले आहेत. महाकाली येथील धाम नदी प्रकल्प १०० टक्के भरला असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे ३ दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले असून वर्धा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर देवळी तालुक्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार (Heavy Rain) पावसामुळे नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. सरूळ, अलमडोह, निमसडा, आलोडा, डिगडोह गावाचा संपर्क तुटला आहे. 

तसेच घोडेगाव येथील नाल्याला आलेल्या पाण्यामुळे सेंद्री सोनोरा या गावाचा संपर्क तुटला आहे. नांद प्रकल्पाचे पाच दरवाजे २५ से.मी. ने उघडले असून धरणातील पाणी वणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कारंजा (घाडगे) तालुक्यातील एकमेव असलेले कार नदी प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो झाला आहे. धरण १०० टक्के भरल्याने तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह ओलिताचा प्रश्न सुटला आहे. कार धरण पहिल्या पावसात ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटक याठिकाणी गर्दी  केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Cheapest Recharge: मोबाईल डेटा संपतोय लवकर? जिओचे ५० रुपयांखालील डेटा प्लॅन ठरतील बेस्ट पर्याय

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

SCROLL FOR NEXT