Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : पेरणीसाठी गेलेल्या चुलत भावांचा वीज पडून मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Wardha News : कारंजा घाडगे शहरापासून पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरेश्वर सरोदे यांच्या शेतात कपाशी पिकाची पेरणी सुरू होती. पेरणीकरिता मजूर असल्याने रितेश व राजू हे देखील शेतात गेले होते.

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यातच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. पाऊस आल्याने पेरणीच्या कामाला वेग आला असून शेतात पेरणीच्या कामाला गेलेल्या दोघा चुलत भावांचा वीज पडून मृत्यू झाला. सदरची घटना वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे येथे बिहाडी शेत शिवारात घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जातं आहे. 

वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे येथील रितेश मोरेश्वर सरोदे (वय २८) व राजू ताराचंद सरोदे (वय १६) असे घटनेत मृत झालेल्या चुलत भावांची नावे आहेत. कारंजा घाडगे शहरापासून पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरेश्वर सरोदे यांच्या शेतात कपाशी पिकाची पेरणी सुरू होती. पेरणीकरिता मजूर असल्याने रितेश व राजू हे देखील शेतात गेले होते. पेरणी सुरु असतांना अचानक जोरदार पावसाला सुरवात झाली.

झाडाच्या आडोश्याला राहिले उभे 

दरम्यान दोघेही भाऊ शेतातील निंबाच्या झाडाखाली आडोश्याला उभे राहण्यासाठी गेले. तर सोबत असलेले शेतातील आठ ते दहा मजूर हे त्यांच्यापासून पन्नास फूट अंतरावर असलेल्या दुसऱ्या झाडाखाली उभे झाले. अश्यातच रितेश आणी राजू उभे असलेल्या झाडावर अचानक वीज कोसळली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुदैवाने मजूर दुसऱ्या झाडाखाली असल्याने ते थोडक्यात बचावले.

एकुलत्या एक मुलाचा मृत्यू 

वीज पडून दोन्ही चुलत भावांचा मृत्यू झाल्याने सगळीकडे शोककळा पसरली आहे. तर सोबत असलेल्या शेत मजुरांच्या डोळ्यादेखत घटना घडल्याने ते देखील प्रचंड घाबरले होते. मोरेश्वर सरोदे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे आणि ताराचंद सरोदे यांना मुलगा आणि दोन मुली आहेत. ताराचंद यांचा एकुलता एक मुलगा वीज कोसळल्याने मृत्यू पावला असून परिवाराने एकच आक्रोश केला. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras: आयुष्यात सुख-समृद्धीची होईल भरभराट, फक्त धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा 'या' गोष्टी

Goa Tourism : दिवाळीच्या सुट्टीत मित्रांसोबत गोवा ट्रिप करा, 'या ' Hidden लोकेशनला नक्की भेट द्या

Politics : युतीत फूट, भाजपला मोठा धक्का; NDA तील मित्रपक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार

Tejashree Pradhan: क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो... तेजश्रीचं सौंदर्य पाहून हेच म्हणाल

कौटुंबिक वादातून पत्नीची पतीकडून हत्या; परिसरात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT