Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचे अडीच महिन्यापासून पगार नाही; कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिला थेट इशारा

Wardha News : आरोग्य विभागाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन सुरु केले. दोन दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या शासन दरबारी मांडल्या

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : वर्ध्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील अडीच महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. अजून देखील पगार कधी होतील, हे सांगणे अवघड आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. वर्धा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरु असून यातून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडल्या आहेत. दरम्यान मागण्या मान्य न केल्यास सरकारला थेट इशाराच दिला आहे. 

महाराष्ट्र आरोग्य विभागाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्धा जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. दोन दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या शासन दरबारी मांडल्या आहे. रखडलेले पगार, केंद्र सरकारने वाढ देऊनही राज्य सरकार वाढ न देणे. या सोबत कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. 

तर मागील सहा महिन्यापासुन शासन आमची पिळवणूक करत आहे. मधल्या काळात सुद्धा पगार रखडवला होता. आता पुन्हा अडीच महिन्यापासुन पगार नाही. पगार मागितल्यास अधिकारी म्हणतात अजून निधी आला नाही. केंद्र शासनाकडून आलेली पगारवाढ राज्य सरकारने अद्याप दिली नाही. तसेच मागील वर्षी दिवाळीत काळी दिवाळी साजरी करत ३७ दिवस आंदोलन केले होते. त्यावेळी राज्य सरकारने शासन निर्णय काढून ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष झाले त्यांना एकत्र समायोजन करू असं सांगितलं होत. 

तर बेमुदत उपोषणाचा इशारा 

मात्र तेरा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील यावर काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. याबद्दल मंत्री आणि अधिकाऱ्यांना विचारलं तर काम सुरु आहे असं उत्तर देतात. दरम्यान अडीच महिन्यांपासून रखडलेले पगार चार दिवसात झालं नाही. समायोजन विषयावर निर्णय घेतला नाही; तर २३ तारखेपासुन नागपूरच्या संविधान चौकात बेमुदत उपोषण करणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: NEET पेपर फुटीप्रकरणी RCC क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक

Hair Cut: नवदीचा 'बॉब' हेअरकट पुन्हा ट्रेंडमध्ये; पाहा तुमच्या चेहऱ्यानुसार कोणता कट दिसेल परफेक्ट

Kerala CM Oath Ceremoney : मोठी बातमी! केरळच्या मुख्यमंत्रीपदी व्ही. डी. सतीशन, दिग्ग्ज नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ

SCROLL FOR NEXT