Dhule Bribe Case : वीज मीटरमध्ये छेडछाड, सेटलमेंटसाठी ३० हजारांची लाच; खाजगी तंत्रज्ञ एसीबीच्या ताब्यात

Dhule News : खासगी वायरमन हा वेळोवेळी दुकानात येत वीज मीटरमध्ये छेडछाड झाली असून यामधून तुम्ही मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली आहे. महावितरणला दंड भरण्यापेक्षा याचे सेंटलमेंट करून देतो, असे सांगत होता
Dhule Bribe Case
Dhule Bribe CaseSaam tv
Published On

धुळे : घरात असलेल्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून काहीजण वीज चोरी करत असतात. त्यानुसार वीज मीटर तपासणीसाठी आलेल्या खासगी तंत्रज्ञाने वीज मीटरमध्ये छेडछाड झाली आहे. सेटलमेंट करण्यासाठी ३० हजारांची मागणी केली. त्यानुसार लाच स्वीकारताना खाजगी तंत्रज्ञास धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. 

धुळे शहरातील देवपूर भागात एसीबीने कारवाई केली आहे. मुकुंद लक्ष्मण दरवडे असे अटकेतील तंत्रज्ञाचे नाव आहे. दरम्यान देवपूर परिसरात देशी दारूच्या दुकानात जुने मीटर आहे. महावितरणकडून जुने मीटर काढून नवीन मीटर लावण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेत सुमारे वीस दिवसांपूर्वी संबंधित दुकानातील जुने मीटर काढून मुकुंद दरवडे याने नवीन मीटर बसवले होते. मात्र काढून नेलेल्या मीटरमध्ये छेडछाड असल्याचे तो सांगत होता. 

Dhule Bribe Case
Ujani Dam : पुण्यासह सोलापूर, नगर जिल्हा वासियांची चिंता वाढणार; उजनी धरणात केवळ २ टीएमसीच जिवंत पाणीसाठा

सेटलमेंटसाठी पैशांची मागणी 

संबंधीत लाचखोर खासगी वायरमन हा वेळोवेळी दुकानात येत वीज मीटरमध्ये छेडछाड झाली असून यामधून तुम्ही मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली आहे. महावितरणला दंड भरण्यापेक्षा याचे सेंटलमेंट करून देतो, असे सांगत होता. त्यासाठी ३० हजार रुपये द्यावे लागतील. अन्यथा ४६ हजारांचा दंड भरावा लागेल अशी धमकी देत संबंधित दुकानदाराला घाबरवत होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या या दुकानदाराने थेट धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 

Dhule Bribe Case
Sambhajinagar Crime : रागाने बघितल्याने दोन गटात तुफान राडा; संभाजीनगरात जुन्या वादातून कुरापत, तिघे जखमी

एसीबीने रंगेहाथ पकडले  

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने तक्रारीची शहानिशा करत पडताळणी केली. यानंतर सापळा रचण्यात आला आणि दरवडे हा देवपूर येथील दुकानात आल्यानंतर त्याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारली तेव्हा पथकाने त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरवडे याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पुढील करवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com