Wardha News
Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: लाचखोर पोलीस उपनिरीक्षकास बेड्या; पत्‍नीला आरोपी न बनिवण्यासाठी घेतले दोन लाख

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : फसवणुकीच्या गुन्ह्यात पत्नीला आरोपी न बनविण्यासाठी तसेच मालमत्ता जप्त न करण्यासाठी तक्रारदाराला दोन लाख रुपयांची लाच (Bribe) घेतांना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले आहे. वर्ध्याच्या (wardha) जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस उपनिरीक्षक विवेक जानराव लोणकर याला रंगेहात अटक केली. ही कारवाईनागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आरती चौकात असलेल्या नर्सरीच्या प्रवेशद्वारासमोर पहाटे केली. (Tajya Batmya)

हिंगणघाट पोलिस (Police) ठाण्यांच्या हद्दीत एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीची रक्कम ४४ लाखांवर असल्याने हे प्रकरण हिंगणघाट पोलिस ठाण्यातून पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक विवेक जानराव लोणकर यांच्याकडे होता.

पैशांसाठी मानसिक दबाव

याप्रकरणात अकोला येथील रहिवासी असलेले फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयातून अंतरिम जामीन मंजूर झाला होता. तक्रारदार तारखेवर हजरही राहत होता. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेतील लाचखोर विवेक लोणकर याने फसवणूकीतील आरोपीला दाखल गुन्ह्यात त्याच्या पत्नीला आरोपी न बनविण्यासाठी तसेच मालमत्ता जप्त न करण्यासाठी तसेच जामीन रद्द न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यावर सातत्याने लोणकरकडून मानसिक दबाव निर्माण केला जात होता. अखेर तक्रारदाराने हताश होत नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून पोलिस अधीक्षक राहुल माखणीकर यांच्याकडे तक्रार दाखल केली.

दोन लाख घेतले अन्‌

तक्रार दाखल होताच सापळा रचण्यात आला. प्रकरणी पहाटेच नागपुर येथील लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अनामिका मिर्जापुरे यांचे पथक वर्ध्यात दाखल झाले. आरती चौकातील नर्सरीसमोर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपी विवेक लोणकर याला फोन करुन बोलाविले. आरोपी लोणकर हा दुचाकीने नर्सरीच्या प्रवेशद्वाराजवळ आला. तेथून त्याने झाडेही विकत घेतली. तेवढ्यातच तक्रारदाराकडून लोणकरने दोन लाख रुपये घेत दुचाकीच्या डिक्कीत ठेवत असतानाच त्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. या कारवाईत पोलिसांनी लोणकर यांची दुचाकीही जप्त केली आहे.

या कारवाईनंतर वर्धेच्या आर्थिक गुन्हे शाखेत होत असलेल्या भ्रष्टाचार उघड झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेत मागील दीड वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. अनेक प्रकरणात स्वतःहून हस्तक्षेप करणे, पत्र पाठवत चौकशीला बोलावणे आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करुन मोठी रक्कम उकळविणे हा प्रकार सुरु असल्याचे अनेकांच्या तोंडून एकावयास मिळत होते. लचलुचपत विभागाच्या या कारवाईनंतर नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी मागील दोन वर्षात आर्थिक गुन्हे शाखेत झालेल्या प्रकरणांच्या तपासाचा तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT