Cyber Crime: बॅंक मॅनेजरलाच गंडा; ग्राहक असल्याचे सांगत साडेपंधरा लाख लांबविले

बॅंक मॅनेजरलाच गंडा; ग्राहक असल्याचे सांगत साडेपंधरा लाख लांबविले
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On: 

नागपूर : सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे सल्ले बॅंक मॅनेजर देत असतात. पण सायबर गुन्हेगाराने चक्क (Nagpur) नागपूरातील बॅंक मॅनेजरलाच गंडा घातल्‍याचा प्रकार समोर आला आहे. (Live Marathi News)

Cyber Crime
Samruddhi Mahamarg Accident: उद्‌घाटनाच्या तिसऱ्याच दिवशी समृद्धी महामार्गावर दोन अपघात

सायबर क्राईमचे (Cyber Crime) प्रकार गेल्‍या काही दिवसांपासून वाढत आहेत. बँक खात्‍यातून रक्‍कम करण्यासाठी वेगवेगळे प्रकार सायबर गुन्‍हेगार वापरत आहेत. यातून सामान्‍य नागरीकांसह पोलिस, डॉक्‍टर देखील बळी पडले आहेत. परंतु, नागपूरात थेट (Bank) बँक मॅनेजरचीच फसवणूक केल्‍याचा प्रकार झाला आहे.

डमी ग्राहक बनून गेला

डमी ग्राहक बनून सायबर गुन्हेगाराने तब्बल साडेपंधरा लाख रुपये दुसऱ्या खात्यात वळते केले. प्रकार उघडकीस आल्यावर बॅंकेत खळबळ उडाली आहे. बॅंक ॲाफ इंडियाचे मॅनेजर राहून भोंगे यांच्या तक्रारीवरुन नागपूरातील सदर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पोलीसांकडून सायबर गुन्हेगारांचा शोध सुरु सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com