Ashti Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Ashti Heavy Rain : आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान, शेतात पडला संत्र्यांचा सडा

Wardha News : आष्टी तालुक्यातील देलवाडी, जोलवाडी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील देलवाडी, जोलवाडी शिवारात शिवारात मंगळवारी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बगीच्यामध्ये अक्षरशः संत्राचा सडा पडल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. यामुळे मोठे नुकसान झाले असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनाम करून मदतीची मागणी केली आहे.

राज्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. अशात काही भागात जोरदार पाऊस होत असल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नदी- नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शेतांमध्ये गेल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. यातच वर्धा जिल्ह्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. 

८० टक्के फळांचे नुकसान 

मंगळवारी संध्याकाळी देलवाडी, जोलवाडी शिवारात जोरदार पाऊस झाला. काही वेळ आलेल्या पावसामुळे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. संपूर्ण शेत परिसरात पाणीचपाणी दिसत आहे. या परिसरात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. या शेतकऱ्यांचे ७० ते ८० टक्के फळांचे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर अनेक झाडे सुद्धा कोलमडून पडली आहे. संत्र्याची फळे हे जमिनीवर पडून वाहून गेली आहे. काही वेळ आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक वाहून गेले आहे.

पंचनामा करण्याची मागणी 
अचानक आलेल्या पावसामुळे परिपक्व झालेली संत्रा जमिनीवर पडून थेट शेतकऱ्यांच्या धुऱ्यापर्यंत वाहून गेलाय. खाली पडलेला संत्रा खराब झाल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान यात झाले आहे. यामुळे या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून मदत करण्याची मागणी केली जातं आहे. अवघ्या काही वेळ आलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT