Wardha Car and Bike Accident News Saam TV
महाराष्ट्र

Wardha Accident News: नागपूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Wardha Car and Bike Accident: ही दुर्देवी घटना नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पवनार परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.

Satish Daud

चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha Accident News

महामार्गावरून चुकीच्या दिशेने दुचाकी चालवीत दुभाजक ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना भरधाव येणाऱ्या कारने जबर धडक दिली. या धडकेत पती जागीच ठार झाला तर पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पवनार परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवधूत वैरागडे (वय ६० वर्ष) व चित्रा वैरागडे (वय ५५ वर्ष) दोघेही रा. केळझर, असे मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, अवधूत वैरागडे व त्यांच्या पत्नी चित्रा हे दोघेही दुचाकीने वर्धा येथून (Wardha News) नागपूरकडे जात होते.

अवधूत हे चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत महामार्गावरील दुभाजक ओलांडण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान नागपूरकडून वर्ध्याकडे जात असलेल्या कारने दुचाकीला धडक (Car Accident) दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील पती-पत्नी रस्त्यावर फेकले गेले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या पत्नी-पत्नीला तातडीने उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अवधूत वैरागडे यांचा रुग्णालयात जाण्याआधीच मृत्यू झाला होता.

तर त्यांच्या पत्नी चित्रा यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पती-पत्नीचा एकाच वेळी अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असूनही अपघातग्रस्त कार सेलू येथील अरविंद सोमनाथे यांची असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT