wardha news  saam tv
महाराष्ट्र

Wardha : मुसळधार पावसाचा कुक्कुटपालन व्यवसायाला फटका; आर्वी तालुक्यात १० हजार कोंबड्यांचा मृत्यू

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या जोरदार पावसाचा परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यात झाला आहे. तसाच मुसळधार पावासाचा फटका वर्धा जिल्ह्याला देखील फटका बसला आहे.

संजय डाफ

वर्धा : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या जोरदार पावसाचा परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यात झाला आहे. तसाच मुसळधार पावासाचा फटका वर्धा जिल्ह्याला देखील फटका बसला आहे. तर वर्ध्यातील (Wardha) आर्वी तालुक्यात पावसाची अतिवृष्टी झाली. आर्वी तालुक्यात 174.4 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या देऊरवाडा गावातील 110 घरात शिरले पावसाचे पाणी शिरले. तर खूबगाव येथील कुक्कुटपालन शेड मधील 10 हजार कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. ( Wardha News In Marathi )

वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील पावसाची अतिवृष्टी झाली. त्यामुळे आर्वी देउरवाडा मार्गावर नाल्याची साफसफाई न केल्याने पावसाचे पाणी साचले. त्यामुळे रात्री झालेल्या पावसामुळे देऊरवाडा गावातील 110 घरात पाणी शिरले. यामुळे गावातील अनेक कुटुंबाची अत्यावश्यक वस्तूचं नुकसान झालं. गावातील रस्त्यावर घरात तीन ते चार फूट पाणी साचले होते. तालुक्यातील बाराशे हेक्टर शेतातील पीक जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.

दुसरीकडे खूबगाव येथील आसुलकर यांच्या शेतातील कुक्कुटपालन शेडमधील 10 हजार कोंबड्याचा मृत्यू झाला. हेमंत आसुलकर व गजानन आसुलकर या दोन्ही भावंडांचे मोठं नुकसान झाले आहे. अतिवृष्टी पावसामुळे (Rain) आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तातडीने प्रशासनाने पंचनामा करून मदत करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहे. तर काही घराची पडझड झाली आहे. देउरवाडा येथील अनेक कुटुंबाची व्यवस्था शाळेत करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT