Wardha Gramsabha Video Saam Tv
महाराष्ट्र

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

Wardha Gramsabha Violent Video: वर्ध्यामध्ये दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. ग्रामसभेदरम्यान ही घटना घडली. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More
  • वर्ध्यात ग्रामसभेत २ गटांमध्ये तुंबळ हाणामारी

  • नांदगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दोन गट आमनेसामने आले

  • ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर वाद झाला

  • या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले

  • या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

चेतन व्यास, वर्धा

वर्धामध्ये ग्रामसभेत राडा झाला. यावेळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ग्रामसभा सुरू असतानाच दोन गट आमनेसामने आले आणि त्यांनी एकमेकांना धुधु धूतलं. या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या प्रकरणी दोन्ही गटाविरोधात हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वर्धामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्याच्या हिंगणघाट पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेदरम्यान राडा झाला. ग्रामसभेत एका नागरिकाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर वादाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. पाहता पाहता या वादाचे रूपांतर दोन गटांतील हाणामारीत झाले. ग्रामसभा सुरू असतानाच सभागृहात दोन्ही गटांमध्ये जोरदार मारामारी झाली. ग्रामपंचायत सभागृहाबाहेरही ग्रामसभेला उपस्थित नागरिकांमध्ये राडा झाल्याचा व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गावातील रस्त्यावर सांडपाणी साचत असल्याने त्या ठिकाणी मुरूम टाकण्याची मागणी ग्रामसभेत करण्यात आली होती. याच मुद्द्यावरून वाद उफाळून आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामसभेसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी नोडल अधिकारी म्हणून एका मुख्याध्यापकाची नियुक्ती केली होती. ग्रामसभेतील राड्यानंतर दोन्ही गट हिंगणघाट पोलिस ठाण्यात पोहोचले असून परस्पर तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. ग्रामसभेतील या हाणामारीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नांदगाव परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT