Cyber Crime
Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: कुरीअरसाठी गुगलवर नंबर शोधणे पडले महागात; ९८ हजार रुपयांची फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : कुरिअर करण्याकरिता गुगलवर नंबर शोधला असता सांगितल्याप्रमाणे अँप डाऊनलोड केले. ॲप डाऊनलोड करताच मोबाईलचा ताबा घेत ९८ हजार रुपयांची (Fraud) फसवणूक केली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला. (Tajya Batmya)

सेवाग्राम येथील गर्ल्स हॉस्टेलमध्ये असलेल्या फिर्यादीने कुरिअर करण्याकरिता गुगलवर नंबर शोधला. त्या नंबरवर कॉल केला असता (Cyber Crime) एनिडेस्क ॲप डाऊनलोड करायला सांगितले. फिर्यादीस एनिडेस्क ॲप डाउनलोड करायला सांगून मोबाईलचा ताबा घेतला. त्यातून ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांचे आवाहन

ऑनलाईन व्यवहार किंवा ॲप डाऊनलोड करताना अनेकदा फसवणुकीचे प्रकार पुढे येतात. यामुळे गुगलद्वारे कोणत्याही प्रकारचे नंबर शोधताना शहानिशा केल्याशिवाय कॉल किंवा मॅसेज करू नये. कोणतेही अनोळखी अँप डाउनलोड करणे किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT