Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : विदेश गिफ्ट पाठविल्याच्या नावे महिलेची फसणूक; २७ लाख ३८ हजार उकळले

Wardha News : सायबर गुन्हेगार नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवत ऑनलाईन शॉपिंग, खोट्या गुन्ह्यात अडकल्याची बतावणी करणे, लॉटरी लागणे यासह विविध प्रकारचे फंडे वापरून नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवत असतात

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: सध्या सायबर गुन्हेगारांकडून विविध वेगवेगळे फंडे वापरून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशीच एक घटना वर्धेच्या आर्वी शहरात घडली. यात एका महिलेला विदेशी गिफ्ट पाठवून कस्टम विभागाने पकडल्याने त्यात विदेशी चलनाचे नाणे सापडले आहे. पोलिस केस टाळण्यासाठी पैशांची मागणी केली. यातून महिलेने २७ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम दिल्याचा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे. ऑनलाईन शॉपिंग, खोट्या गुन्ह्यात अडकल्याची बतावणी करणे, लॉटरी लागणे यासह विविध प्रकारचे फंडे वापरून नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवत असतात. भीतीपोटी नागरिक लाखो रुपयांनी गंडविले जातं आहे. असाच प्रकार वर्धा जिल्ह्यात उघडकीस आला आहे.   

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात 
वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरातील रहिवासी महिलेची एका अज्ञात व्यक्तीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. यात अज्ञाताने आपण विदेशात राहत असल्याचे सांगितले. इन्स्टाग्रामवर बोलत असताना विदेशातून गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सदर गिफ्ट पाठविल्यानंतर ते गिफ्ट कस्टम विभागाने पकडले असून ते सोडविण्याच्या नावावर विविध टॅक्स, तसेच गिफ्टमध्ये विदेशी चलनाच्या नाणी सापडल्यामुळे त्याची पोलिस केस न होऊ देण्याच्या पैशांची मागणी केली होती. 

भीतीपोटी महिलेने रक्कम केली ट्रान्सफर 

दरम्यान समोरच्याने महिलेच्या मनात भीती घातली. यामुळे महिलेने भीतीपोटी वेळोवेळी एकूण २७ लाख ३८ हजार रुपये समोरच्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर केली. मात्र या प्रकारात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. सायबर पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elvish Yadav-Engaged 2 : महिलेचा टी-शर्ट काढला, आंघोळ घातली अन्...; एल्विश यादवच्या शोमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEOS पाहून नेटकरी भडकले

Latur Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! धाकट्या भावनेचं काढला थोरल्या भावाचा काटा; कारण ऐकून व्हाल थक्क

Accident : भीषण अपघात! ट्रेलरची PCR गाडीला धडक, ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी

Viral Video: वधू-वरासह लग्नाचा संपूर्ण स्टेज कोसळला; AI च्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ

Daily Walk Time: दिवसाला किती चालणं शरीरासाठी फायद्याचे ठरेल? वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती

SCROLL FOR NEXT