Wardha Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Wardha Cyber Crime : ऑनलाइन फसवणुकीचा नवा फंडा; मुलगा गंभीर गुन्ह्यात, पोलिस असल्याची बतावणी करत पैशांची मागणी

Wardha News : सायबर गुन्हेगार हे फसवणूक प्रामुख्याने दोन पद्धतीने करत आहेत. सर्वप्रथम समोरची व्यक्ती कुरिअर सर्व्हिसचे प्रतिनिधी असल्याचे भासवते.

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : तंत्रज्ञानाच्या जोरावर सर्व काही ऑनलाइन उपलब्ध असल्याने सगळी कामे सोपी झाली आहेत. मात्र, या इंटरनेट, (Wardha) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांची फसवणूकही केली जात आहे. सध्या सायबर भामट्यांनी नवा फंडा सुरू केला असून, बाहेर राज्यात, देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना (Cyber Crime) कॉल करून तुमचा मुलगा गंभीर गुन्ह्यात फसल्याची बतावणी करून लाखो रुपयांची मागणी करण्याचा प्रकार पुढे आला आहे. वर्धा सायबर सेलकडे जवळपास १० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. (Maharashtra News)

सायबर गुन्हेगार हे फसवणूक (Fraud) प्रामुख्याने दोन पद्धतीने करत आहेत. सर्वप्रथम समोरची व्यक्ती कुरिअर सर्व्हिसचे प्रतिनिधी असल्याचे भासवते. आमच्याकडे एक पाकीट आले असून, यात बेकायदा वस्तू आहेत. या कृत्यात तुमचा मुलगा सापडला आहे, असे सांगितले जाते, तर दुसऱ्या प्रकारच्या पद्धतीत समोरची व्यक्ती मी पोलिस (Police) अधिकारी आहे; असे सांगत मुलगा वा मुलीवर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे भासवण्याचा प्रयत्न केला जातो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसात १० तक्रारी 

वर्ध्यातील उच्च पदस्थ, तसेच शासकीय अधिकाऱ्यांची मुले बाहेरील राज्यासह बाहेर देशात उच्च शिक्षण घेत आहेत. अशांच्या पाल्यांचा डेटा चोरून सायबर भामटे त्यांच्या पालकांना फोन करून तुमचा मुलगा वा मुलगी गंभीर गुन्ह्यात सापडला आहे. आम्ही पोलिस ऑफिसर बोलत असून त्यांना वाचविण्यासाठी पैसे द्यावे लागेल; असे म्हणत पैशांची मागणी करत आहेत. जवळपास दहा तक्रारी मागील पाच दिवसांत (Cyber Police) सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT