Wardha Crime News Saam tv
महाराष्ट्र

Wardha Crime News : वर्धा हादरले.. प्रेम प्रकरणातून युवकाचा खून, युवती गंभीर जखमी

Wardha News : युवतीचा वाढदिवस असल्याने संशयित प्रवीण सोनटक्के हा मुलाला भेटण्यासाठी वर्धेत आला होता. त्याने तरुणीला फोन लावला असता तिने उचलला नाही

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : तरुणीचा वाढदिवस असल्याने शुभेच्छा देण्यासाठी फोन केला असता उचलला नाही. यामुळे तरुणीच्या रूमवर गेला असता एक युवक रूमवर दिसून आला. याचा राग आल्याने संशयिताने लोखंडी रॉडने तरुणाच्या डोक्यावर जबर मारहाण केली. तसेच तरुणीला देखील डोक्यावर जबर मारहाण केल्याने तरुणी गंभीर जखमी असून तरुणाचा मात्र यात मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे.  

सदरच्या घटनेत मोहित मोहुर्ले असे मृतकाचे नाव आहे. तर प्रवीण सोनटक्के असे संशयित आरोपीचे नाव आहे. (Crime News) मृतक मोहित हा चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील एका गावातील रहिवासी होता. तर संशयित प्रवीण व जखमी तरुणी हे दोघे देखील वरोरा तालुक्यातील एकाच गावातील होते. दरम्यान युवतीचा वाढदिवस असल्याने संशयित प्रवीण सोनटक्के हा मुलाला भेटण्यासाठी वर्धेत (Wardha) आला होता. त्याने तरुणीला फोन लावला असता तिने उचलला नाही. यामुळे तो थेट सावंगी परिसरातील साई पार्क येथे भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या तरुणीच्या रूमवर गेला असता तेथे मोहित मोहुर्ले हा दिसून आला. यामुळे प्रवीणचा राग अनावर झाला.

संतापलेल्या प्रवीणने मोहितच्या डोक्यावर लोखंडी रोडने मारहाण करत गंभीर जखमी केले. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याने तरुणीवर देखील रोडने मारहाण केली. यात तरुणी गंभीर जखमी असून तरुणीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. प्रेमसंबंधातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. घटनानंतर (Police) पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, पोलीस निरीक्षक सावंगी संदीप कापडे, महादेव सरोदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड आणि सलाम कुरेशी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला सुरवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT