wardha crime news saam tv
महाराष्ट्र

दुर्देवी! वर्ध्यात बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

अल्लीपूर पोलीस स्टेशनं अंतर्गत येणाऱ्या पाथरी येथे नवीन अंगणवाडीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी भरुन असल्याने त्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Wardha Crime News : अल्लीपूर पोलीस स्टेशनं अंतर्गत येणाऱ्या पाथरी येथे नवीन अंगणवाडीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी भरुन असल्याने त्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सदर घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडलीय आहे. या घटनेने पाथरी गावात खळबळ उडाली आहे. सार्थक बाळकृष्ण घोडाम (०९) असे मृतक बालकाचे नाव आहे.

सार्थक घोडाम हा वर्धा (Wardha) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. रविवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याची गावात शोधाशोध केली. मात्र, तो कुठेही सापडला नाही.

तेवढ्यातच कुटुंबीयांना गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ नवीन इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्याजवळ सार्थकचा जोडा आढळून आला. अखेर त्याच खोदलेल्या खड्ड्यात त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अंगणवाडीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पाणी भरले आहे. त्याच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलीस पाटील संजय चरडे यांनी याबाबतची माहिती अल्लीपूर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री १० वाजताच्या सुमारास सार्थकचा मृतदेह पाण्याने तुडूंब भरलल्या खड्ड्यातून बाहेर काढत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धेच्या शासकीय रुग्णालयात पाठवला.

या प्रकरणात कंत्राटदाराचा हलगर्जीपणा दिसल्याने पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी कंत्राटदार आकाश राऊत याच्याविरुद्ध ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. या घटनेने पाथरी गावावर शोककळा पसरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला 'साम'वर, 6 विधानसभेसाठी ठाकरे बंधूंचा मास्टरप्लॅन

Shahi Tukda Recipe: संध्याकाळी काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा हॉटेल स्टाईल शाही तुकडा

Maharashtra Live News Update: ⁠- नाशिक पोलिस मुंबईच्या वेशीवर दाखल

Kiwi Benefits: थंडीत किवी खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

SCROLL FOR NEXT