Wardha Crime saam tv
महाराष्ट्र

Wardha Crime: रेल्वे स्टेशनवर महिनाभर पाहिली प्रेयसीची वाट; नंतर घरात जाऊन प्रियकरानं केला घात

Wardha Crime: वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर येथे तरुणीची हत्या करून पसार झालेल्या माथेफिरु प्रियकराला पोलिसांनी अटक केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(चेतन व्यास )

Wardha crime :

वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर येथे तरुणीची हत्या करून पसार झालेल्या माथेफिरु प्रियकराला पोलिसांनी अटक केलीय. दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत त्याने प्रेयसीच्या घरात घुसून तिची हत्या केली होती. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने करून अवघ्या ३६ तासांत आरोपी प्रियकराला मोठ्या शिताफीने अटक केली. (Latest Crime News)

अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव येथील रेल्वेस्थानक परिसरात प्रियकराला अटक करण्यात आली. आशिष उर्फ रमेश आढाऊ( वय ३४), असं आरोपीचं नाव आहे. आशिष हा यवतमाळ जिल्ह्यातील गणोरी गावाचा रहिवाशी आहे.

महिनाभर पाहिली वाट

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रेयसी ही नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत होती. तेथेच तिचे आरोपी आशिषसोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोन महिन्यांपूर्वी तिच्या गावी अल्लीपूर येथे आली होती. आरोपी आणि मृत प्रेयसी यांचा फोनवरुन संवाद सुरू होता. मृत प्रेयसी हिने आरोपी आशिषला यवतमाळ येथून वर्ध्याला भेटण्यासाठी बोलावले होते.

आशिष हा वर्धा रेल्वेस्थानकावर आला पण, प्रेयसी आली नाही. प्रेयसीनं आशिषला भेटण्याचं टाळत होती. त्याने वारंवार फोनही केला पण तिने घेणं टाळलं. अखेर आशिष हा जवळपास महिनाभर वर्धा रेल्वेस्थानकावरच वाट पाहत राहिला. महिनाभर तो तेथे राहू लागला होता. एकेदिवशी तो थेट प्रेयसीच्या घरी गेला आणि तिची हत्या केली. पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर त्याला अटक केल्यानंतर त्याने तिचा खून केल्याची कबूल केले.

घरात घुसून केली हत्या

प्रेयसीची हत्या केल्याच्या दिवशी आशिष हा जवळपास ४५ ते ५० मिनिटे अल्लीपूर गावात होता. मृत प्रेयसीच्या घरासमोरून घिरट्या घालत होता. तिच्या घरी कुणी नसल्याचे पाहून आरोपीने प्रेयसीच्या घरात प्रवेश केला. दोघांत वाद झाल्यानंतर त्याने तिची हत्या केली. जवळपास पाऊण तास आशिष प्रेयसीच्या घरात होता आणि त्यानंतर तेथून पळून गेला. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि अल्लीपूर पोलिसांच्या पथकाने गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे केला.

रेल्वे स्टेशनवर अटक

पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना केली. गुन्हे शाखेचे दोन शोध पथकांनी आरोपीचा राळेगाव, कळंब, यवतमाळ, बाभुळगाव, देवगाव परिसरात शोध घेतला. अखेर आरोपी धामणगाव रेल्वे स्टेशन येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यानंतर आरोपी आशिषने गुन्हा केल्याची कबुली दिली.

दरम्यान ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रफुल्ल डाहुले, सहायक पोलीस निरीक्षक दीपक वानखडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, दिनेश बोधकर, मनिष कांबळे, प्रदीप वाघ, अक्षय राउत यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT