Wardha Crime
Wardha Crime SAAM TV
महाराष्ट्र

Wardha Crime: भामट्यांचा अजब कारनामा! घरातून काढला सोन्याने भरलेला हंडा, त्यात निघाले...

Chandrakant Jagtap

>>चेतन व्यास, वर्धा

Wardha Crime: तुमच्या घरात धन आहे आणि ते काढण्यासाठी पैसे लागतील असे म्हणत भामट्यांनी महिलेकडून ५० हजार रुपये उकळल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. विशेष म्हणजे या घरातून काढलेल्या सोन्याच्या हंड्यात सोन्याचे पॉलिश केलेले दगडं निघाले अशी माहिती फसवणूक झालेल्या महिलेने दिली आहे.

वाढोणा येथे घरात सोन्याचा हंडा आणि हिरा असल्याचे आमिष दाखवून भामट्यांनी महिलेकडून ५० हजार रुपये उकळले. महिलेने सोन्याच्या हंड्याची पाहणी केली असता त्यातून सोन्याचे पॉलिश केलेले दगडं निघाले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही भामट्यांना पकडून ठेवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून आसाराम नंदू वाघ आणि रोशन पिसाराम गुजर अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आर्वी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या वाढोणा येथे ९ मार्च रोजी हातात मोरपीस असलेला झाडू घेऊन दोन व्यक्ती आले. त्यातील एकाने येथील इंदिरा गुलाब राऊत या महिलेकडे १० रुपये मागितले. इंदिरा यांनी त्यांना दहा रुपये दिले. त्यानंतर एकाने त्यांच्या डोक्यावर झाडू मारुन तुमच्या घरात सोन्याचा हंडा आहे, तो काढण्यासाठी ६ हजार रुपये लागतील असे सांगितले. (Vardha News)

इंदिरा यांनी सहा हजार रुपये उसने घेऊन त्यांना दिले. दोघांनीही पैसे घेतले आणि तेथून निघून गेले. ११ मार्च रोजी सकाळी ८ वाजता दोघेही पुन्हा महिलेच्या घरी आले आणि घराजवळ खड्डा खोदून जमिनीतून हंडा काढला. यानंतर दोघांनी पुन्हा महिलेकडून १३ हजार रुपये घेतले आणि तुमच्या घरात यापेक्षाही एक मोठा हिरा आहे, तोही काढून देतो असे म्हणत पैसे घेऊन निघून गेले.

दुसऱ्यादिवशी फोन करुन माझ्या मित्राला २१ हजार रुपये देऊन त्याच्याकडून औषध घेऊन या असे भामट्यांनी महिलेला सांगितले. महिलेच्या मुलाने सकाळी बसस्थानकावर जाऊन २१ हजार रुपये दिले आणि औषध घेऊन घरी आला. दोन्ही आरोपी पुन्हा घरी आले आणि त्यांनी ते औषध घेऊन हांडा पुन्हा खड्ड्यात ठेवला आणि तो खड्डा बुजवून टाकला. यानंतर पुन्हा त्यांनी पुन्हा महिलेकडून १० हजार रुपये घेतले.

यानंतर १२ मार्च रोजी महिलेच्या मुलाने त्यांना फोन केला असता हिरा काढण्यासाठी ९ लाख १० हजार रुपये लागतील असे सांगितले. अखेर महिलेने पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितले. यानंतर महिलेला संशय आला आणि तिने हंडा उघडून पाहिला तेव्हा त्यात सोन्याचे पॉलिश केलेले दगड आणि मूर्ती आढळून आली. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. (Latest Marthi News)

यानंतर गावातील नागरिकांनी महिलेच्या मुलाला भामट्यास फोन करुन ९ लाख रुपये देतो असे सांगण्यास सांगितले. रोशन नामक युवकाने फोन करुन पैसे घेऊन जंगलात येण्यास सांगितले. जंगलात येण्यास महिलेच्या मुलाने नकार दिला.

त्यानंतर आरोपी रोशन आणि आसाराम हे दोघे १७ मार्च रोजी रात्री ८.१५ वाजता महिलेच्या घरी आले आणि पैशांची मागणी करु लागले. यावेळी परिसरातील नागरिकांनी दोघांना पकडून ठेवले आणि आर्वी पोलिसांनी यांची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT