Khed Sabha : घरी बसून... खेडच्या सभेपुर्वीच उदय सामंतांनी घेतला उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांचा समाचार

काही दिवसांपुर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड येथे सभा झाली हाेती.
Uday Samant, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Uday Samant, Uddhav Thackeray, Sanjay Rautsaam tv

- जितेश काेळी

Uday Samant : गुवाहाटी, सुरत अजूनही त्यांच्या डोक्यातून जात नाही. सत्ता गेलेली आहे ते कोण स्वीकारत नाही. सहा महिने आम्ही त्यांच्या सभा पाहत आहे. शिवीगाळ, टीका टिप्पणी करणे एवढेच त्यांना जमत आहे. (Maharashtra News)

या सर्व गाेष्टींना उत्तर देण्यासाठी उद्याची आमची सभा नाही. विकासकात्मक कार्य जनतेपुढे ठेवलं जाईल. त्यामुळे उद्याची सभा पुन्हा एकदा आमदार योगेश कदम (mla yogesh kadam) यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वास राज्याचे उद्याेग मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी व्यक्त केला.

Uday Samant, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Pune : 3 लाख रुपयांच्या लाच प्रकरणी युवक काॅंग्रेस प्रदेश महासचिवासह एकास अटक; पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ

उद्या खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा (cm eknath shinde sabha in khed) आयाेजिण्यात आली आहे. या सभेची माहिती देण्यासाठी उद्याेग मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मंत्री सामंत यांनी खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.

मंत्री सामंत म्हणाले ज्यांनी इतरांना पक्षात घेऊन जे आराखडे रचले आहेत ते धुळीला मिळणार आहेत. उद्याची विक्रमी सभा खेड मध्ये होणार आहे. ज्यांनी त्यांच्या सभेत आम्हाला शिवीगाळ केली त्यांना उत्तर देण्यासाठी उद्याची सभा नाही असेही सामंत यांनी नमूद केले.

Uday Samant, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Sindhudurg : मालवणात खळबळ, २५ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; नऊ जण पाेलिसांच्या ताब्यात

ते म्हणाले गुवाहाटी, सुरत अजून त्यांच्या डोक्यातून जात नाही. सत्ता गेलेली आहे ते कोण स्वीकारत नाही. 40 आमदार शिवसेनेतच आहेत. आज धनुष्यबाण देखील या 40 जणांच्या हातात आहे. आम्हाला नाहक बदनाम करण्यासाठी ते अशा सभांचे आयोजन करतात. त्यांना आम्हांला उत्तर देखील द्यायचं नाही असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

अडीच वर्षात महिलांसाठी काही तरी करावे असे घरी बसून काम पाहणा-यांना कधी वाटले नाही. ते आज फक्त आमच्यावर टीका टिप्पणी करीत आहेत असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता सामंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले एसटी प्रवासासाठी महिलांना 50 टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) घेतला आहे. आज पर्यंत अशी सुपीक कल्पना काेणाच्या डोक्यात आली नव्हती असे सामंत यांनी नमूद केले.

राऊतांवर टीका

ते म्हणाले अडीच वर्षाच्या कारकिर्दीत महिलांसाठी काही करावे असे कोणाला वाटले नाही. त्यांचा अपमान कसा करायचा हे साडे नऊ वाजता टीव्ही येणारे नेते करीत हाेते असा टाेला सामंत यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com