wardha citizens andolan against directors of shetkari mahila nidhi bank  Saam Digital
महाराष्ट्र

Wardha: शेतकरी महिला निधी बँकेच्या ठेवीदारांसह कर्मचा-यांचे बेमुदत उपाेषण सुरु

wardha citizens andolan against directors of shetkari mahila nidhi bank: वर्धेच्या महात्मा गांधी चौकात आज आंदोलन करण्यात आले आहे. बँकेत असलेली रक्कम परत मिळण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या बँकेत जवळपास सात हजार ग्राहकांचे पैसे अडकले आहेत.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

आपले कष्टाचे पैसे मिळावेत यासाठी आज (बुधवार) वर्धा येथील शेतकरी महिला निधी बँकेच्या ठेवीदारांसह कर्मचा-यांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या आंदाेलनास नागरिकांनी देखील पाठिंबा दिला आहे.

शेतकरी महिला निधी बँकेत मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या ठेवी अडकल्या आहेत. नागरिकांनी आपल्या ठेवी बँकेत जमा केल्या मात्र संचालकांनी स्वतः मालमत्ता खरेदी करत ग्राहकांना पैसे दिले नाहीत. मागील तीन महिन्यांपासून ग्राहकांसह कर्मचारी पैशासाठी चकरा मारत आहेत.

बँकेने ग्राहकांचे पैसे तातडीने द्यावे, संचालक शरद कांबळे व त्यांच्या परिवाराची मालमत्ता जप्त करून ग्राहकांचे पैसे देण्यात यावे, महिला निधी बँकेच्या संचालकांना तात्काळ अटक करण्यात यावी, ग्राहकांची फसवणूक केल्याचं प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून ग्राहकांचे पैसे मिळवून द्यावेत अशा मागण्या आंदाेलकांच्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT