Anil Deshmukh On Ajit Pawar Group Saam TV
महाराष्ट्र

Anil Deshmukh News: 'शरद पवारांना राजकारणातून संपवण्यासाठी भाजपकडून सुपारी..' अनिल देखमुखांचे अजित पवार गटावर टीकास्त्र

Anil Deshmukh on Ajit Pawar Group: "अजित दादांनी (Ajit Pawar) आपली वेगळी चूल का मांडली हे सर्वांना माहीत आहे. अनिल देशमुख यांना जसा त्रास झाला तसा त्रास होऊ नये याकरिता आमचे जेष्ठ नेते आणि वरिष्ठ सहकारी बाहेर गेले.. असे अनिल देखमुख म्हणाले.

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा |ता. ३० नोव्हेंबर २०२३

Maharashtra Politics News:

तीन दिवसांपूर्वी भोपळला नरेंद्र मोदीच एक भाषण झालं आणि तिसऱ्या दिवशी अजित पवार भाजपात शामिल झाले. अजित दादांनी जो वेगळा निर्णय घेतला तो का घेतला? ते सर्वांना माहिती आहे... असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका केलीय. वर्धेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अनिल देखमुख यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.

काय म्हणाले अनिल देशमुख?

"शरद पवारांना राजकारणातून कस घरी बसवायचं अश्या पद्धतीच्या राजकारणाची भाजपाकडून अजित पवार गटाला सुपारी मिळाली आहे, आणि तश्या पद्धतीने ते काम करत आहेत.." असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. वर्ध्यामध्ये रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेच्या तयारीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांनी हे विधान केले.

यावेळी पुढे बोलताना, "अजित दादांनी (Ajit Pawar) आपली वेगळी चूल का मांडली हे सर्वांना माहीत आहे. अनिल देशमुख यांना जसा त्रास झाला तसा आम्हला त्रास होऊ नये याकरिता आमचे जेष्ठ नेते आणि वरिष्ठ सहकारी बाहेर गेले," असा उपरोधिक टोला अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी लगावला.

पत्रकार परिषदेत अनिल देखमुख यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावरुनही मोठे विधान केले. "अजित दादांचे मुख्यमंत्री पदाबाबत ठरलं आहे माहित नाही. सध्याची परिस्थिती आपण पाहत आहात अजित पवार यांना भाजपने (BJP) आपल्या सरकारमध्ये सामील केले पण अजित दादा यांना कॉर्नर केल जातं आहे.. असे ते म्हणाले.

"निर्णय प्रक्रियेत असो किंवा बाहेरील राज्यातील प्रचारात अजित दादांचा समावेश नाहीय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बाहेर राज्यात प्रचाराला गेले पण अजित दादांना पाठवलं नाही. त्यामुळे अजित पवार यांनी सरकारमध्ये प्रवेश केला पण एकप्रकारे अजित पवार यांना बाजूला ठेऊन निर्णय घेतले जात असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा येणार

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT