Rohit Pawar Vs Chagan Bhujbal Saam TV
महाराष्ट्र

Rohit Pawar News: 'मोठी मोठी भाषणे देण्यापेक्षा पद सोडा..' रोहित पवारांचा छगन भुजबळांना टोला; म्हणाले;...

Rohit Pawar Sangharsh Yatra News: युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेत. बुधवारी ही यात्रा वर्धा जिल्ह्यात दाखल झाली आहे.

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा|ता. ७ डिसेंबर २०२३

Wardha Political News:

युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेत. बुधवारी ही यात्रा वर्धा जिल्ह्यात दाखल झाली आहे. आज (गुरूवार, ७ डिसेंबर) रोहित पवार यांची युवा संघर्ष पदयात्रा ही वर्धेच्या वायफड येथून वर्धेकरीता रवाना झालीय. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी शिंदे- फडणवीस- पवार सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.

काय म्हणाले रोहित पवार?

"सत्तेत असलेल्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी कुटुंब फोडण्याची आणि पक्ष फोडण्याची सुपारी घेतली आहे. तसेच महाराष्ट्रातले महत्वपूर्ण प्रोजेक्ट गुजरातला देण्यात यावे तिथल्या युवकांना न्याय मिळावा याची सुद्धा सुपारी सरकारच्या सर्व नेत्यांनी घेतली आहे. सामान्य लोक अडचणीत आहे पण फक्त पदाबाबत चर्चा करायची स्वतःच हीत जपण्याची सुपारी सुद्धा या सर्व नेत्यांनी घेतली आहे. असा टोला त्यांनी लगावला.

अधिवेशनावरुन निशाणा...

यावेळी बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनावरुनही सरकारवर टीका केली. "सरकारला आमदारांना आणि सामान्य नागरिकांना सुद्धा गृहीत धरते अश्या आजच्या परिस्थितीत सामान्य नागरिक अडचणीत आहे तेव्हा चर्चेत काय आणलंय तर कसीनोच बील चर्चेसाठी आणलं आहे म्हणजे हे सरकार गोंधळेललं आहे आणि निकामी सरकार आहे असं आमचं मत आहे,, असे ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छगन भुजबळांवर टीकास्त्र...

राज्यात आरक्षणावरुन (Maratha Reservation) सध्या मराठा- ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला सुरू आहेत. यावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार टीका केली.

राजीनाम्याची मागणी...

"छगन भुजबळ हे सत्तेत आहे त्यांच्याकडे संविधानिक पद आहे. तुमच्याकडे संवेधानिक पद असेल तर त्याचा वापर कुठेतरी सामान्य लोकांसाठी केल पाहिजे. कॅबिनेटमध्ये तुम्ही बोलले पाहिजे. बाहेर जाऊन मीडिया समोर बोलणे, मोठी मोठी भाषण करने यापेक्षा संविधानिक पद सोडा तरी नाहीतर मग कॅबिनेट मध्ये चर्चा करा..." असे रोहित पवार यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

SCROLL FOR NEXT