Elections  ।  निवडणूक
Elections । निवडणूक  SaamTvNews
महाराष्ट्र

Nagarpanchayat Elections : आष्टी नगरपंचायत मध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही!

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा : आर्वी विधानसभा क्षेत्रातील आष्टी नगरपंचायती निवडणुकीच्या 17 प्रभागाचे निकाल जाहीर झाले असून यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. काँग्रेसला (Congress) बहुमतासाठी एका जागेची गरज आहे. तर, मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला (BJP) चार जागा कमी मिळाल्या आहे तसेच काँग्रेसला देखील दोन जागा कमी मिळाल्या आहेत.

हे देखील पहा :

आष्टी नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक दहा येथून अपक्ष जनशक्ती संघटनेकडून लढत असलेले जाकीर हुसेन आणि काँग्रेसचे विपीन उमाळे यांना सारखी 145 मते मिळाल्याने चिठ्ठी टाकण्यात आली. यात अपक्ष जनशक्ती संघटनेचे जाकीर हुसेन विजयी झाले आहे. आष्टी नगर पंचायतच्या १७ जागासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस ८, भाजपा २, जनशक्ती ५, बसपा व अपक्ष प्रत्येकी 1 जागा मिळाली. प्रभाग 10 मध्ये काँग्रेस व जनशक्तीच्या उमेदवाराला समान मतं मिळाल्याने चिट्ठी काढण्यात आली त्यात जनशक्तीचा उमेदवार विजयी झाला. 

नगरपंचायतीचे नाव - आष्टी

एकुण जागा -17

भाजप - 2

शिवसेना - 0

काँग्रेस - 8

बसपा - 1

राष्ट्रवादी - 0

इतर(अपक्ष) - 6

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shekhar Suman : शेखर सुमन यांचा भाजप प्रवेश; कंगना रणौतचा प्रचार करणार का?

Live Breaking News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Loksabha Election: उत्सव लोकशाहीचा! सेलिब्रिटी ते राजकीय मंडळी; 'या' दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्का; PHOTO

Nagpur News : महिलेचा मोबाईल नंबर घेण्यासाठी लावली ५० हजाराची पैज; तिघे मित्र पोलिसांच्या ताब्यात

PM Modi Rally: काँग्रेस, आरक्षण आणि 26/11; अहमदनगरमध्ये PM मोदींची विरोधकांवर चौफेर फटकेबाजी

SCROLL FOR NEXT