Loksabha Election: उत्सव लोकशाहीचा! सेलिब्रिटी ते राजकीय मंडळी; 'या' दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्का; PHOTO

Gangappa Pujari

लोकसभा निवडणूक...२०२४

राज्यभरातील ११ लोकसभा मतदार संघांमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. सकाळपासूनच लोक मतदान केंद्रांवर गर्दी करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्का बजावला

Ajit Pawar | Saamtv

शरद पवार..

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आज बारामती येथे मतदानाचा हक्क बजावला. तसेच संपूर्ण देशातील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Sharad Pawar | Saamtv

ओमराजेंनी बजावला मतदानाचा हक्क..

धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

Omraje Nimbalkar | Saamtv

सुप्रिया सुळे, रेवती सुळे

बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आई प्रतिभा पवार तसेच रेवता सुळेही उपस्थित होत्या.

Supriya Sule | Saamtv

विशाल पाटील..

सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विशाल पाटील आज सकाळी मतदान केंद्रावर जाऊन सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

Vishal Patil | Saamtv

उदयनराजे भोसले

सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे त्यांनी आज सकाळी सात वाजून सात मिनिटांचा मुहूर्त साधत मतदान केले.

Udayanraje Bhosale | Saamtv

रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख

लातूरमध्ये अभिनेते रितेश देशमुख, पत्नी जेनेलिया देशमुख यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला.

riteish deshmukh | Saamtv

रोहित पवार...

बारामतीमध्ये आमदार रोहित पवार यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्का बजावला.

धैर्यशिल मोहित पाटील..

माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशिल मोहित पाटील यांनी आपल्या मुळगावी पत्नी आणि मुलीसह मतदानाचा हक्क बजावला.

NEXT: भाजपचे 'चाणक्य' अमित शहांच्या संपत्तीचा आकडा किती?

Amit Shah | Saamtv