waluj grampanchayat members disqualified over unauthorized mobile tower Saam Digital
महाराष्ट्र

Sambhajinagar: सरपंच, उपसरपंचासह 17 सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, वाळूज ग्रामपंचायतीत नेमकं घडलं तरी काय? Video

या विरोधात रहिवासी भैय्यासाहेब चव्हाण यांनी शाळेपासून शंभर मीटरच्या अंतरावर टाॅवर उभरण्यास परवानगी देताना ग्रामपंचायतीने कोणताही ठराव घेतला नाही अशी तक्रार केली हाेती.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज ग्रामपंचायतला खाजगी कंपनीला मोबाईल टॉवर उभारण्यासाठी नियमबाह्य परवानगी दिल्याचे प्रकरण चांगलेच भोवलेय. नियमबाह्य परवानगीमुळे अख्खी ग्रामपंचायतच विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्या आदेशाने अपात्र ठरविण्यात आली आहे. सरपंच उपसरपंच यांच्यासह 17 सदस्यांचा यात समावेश आहे.

जिओ डिजिटल फायबर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दोन वर्षांपूर्वी वाळूजला फायबर केबल व नवीन मोबाईल टाॅवर उभरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्या नंतर ग्रामपंचायतने कंपनीला टाॅवर उभारण्याची परवानगी दिली.

या विरोधात रहिवासी भैय्यासाहेब चव्हाण यांनी शाळेपासून शंभर मीटरच्या अंतरावर टाॅवर उभरण्यास परवानगी देताना ग्रामपंचायतीने कोणताही ठराव घेतला नाही अशी तक्रार विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्याकडे केली होती. विभागीय आयुक्तांनी सरपंच उपसरपंच यांच्यासह 17 सदस्यांना अपात्रतेची कारवाई केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT