walmik karad will not wear slippers until the end of baban gite  Saam Tv News
महाराष्ट्र

Beed Crime : संपवल्याशिवाय चप्पल न घालण्याचा एकाचा निश्चय, दुसऱ्यानं बांधली दाढी न करण्याची खूणगाठ; कराड-गिते उठलेले एकमेकांच्या जीवावर

Walmik Karad & Baban Gite Gangwar : वाल्मिक कराड आणि गिते यांच्यात स्थानिक गँगवार असल्याने आज त्याच वादातून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण करण्यात आल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.

Prashant Patil

बीड : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह इतर ४ जण बीडच्या कारागृहात आहेत. बीडमधील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत ते असून संतोष देशमुख हत्या प्रकरणी सध्या त्यांच्यावरील दाखल खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी हे आरोपी तुरुंगात असताना, दुसरीकडे आणखी एका खून प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते बबन गिते हा फरार असून त्याचे सहकारी असलेल्या महादेव गिते सध्या तुरुंगात आहेत.

वाल्मिक कराड आणि बबन गिते यांच्यात स्थानिक गँगवार असल्याने आज त्याच वादातून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण करण्यात आल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली. मात्र, वाल्मिक कराड आणि बबन गिते यांच्यातील वादाचं नेमकं कारण काय आहे, वाल्मिक कराड चप्पल न घालण्याचं गिते कनेक्शन काय? आणि बबन गिते दाढी न करण्याचं कराड कनेक्शन काय? हेही यानिमित्ताने समोर आलं आहे.

दरम्यान, वाल्मिक कराड गेल्या काही दिवसांपासून पायात चप्पल घालत नाहीय. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांपासूनच तो पायात चप्पल घालत नसल्याची चर्चा बीडमध्ये आहे. त्यामागील कारण हे वाल्मिक कराड आणि बबन गिते यांच्यातील वाद. त्यामुळेच, गेल्या अनेक दिवसांपासूनच्या त्याच्या फोटो आणि रिल्समध्ये तो अनवाणी पाहायला मिळाला आहे. वाल्मिकने बबन गितेला संपवल्याशिवाय आपण चप्पल घालणार नाही, असा निश्चय केल्याचं तेथील स्थानिकांकडून सांगण्यात येतं. बबन गिते सध्या आंधळे खून प्रकरणात फरार आहे, पण आंधळे खून प्रकरणात आपणास वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन गुंतवण्यात आल्याचे बबन गितेचं म्हणणं आहे. त्यातच, बबन गितेनेही वाल्मिकला संपवल्याशिवाय दाढी न करण्याची खूणगाठ बांधल्याची काही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT