मकोका कायद्यात जेरबंद असलेल्या वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे समोर येतायत....स्वत:चे आणि कार्यकर्त्यांचे गुन्हे दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या कराडची अशीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावरील कराडच्या कार्य़कर्त्यानं टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टविरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी वाल्मिक कराडनं तत्कालीन सायबर सेलच्या महिला पोलीस अधिकारी निशिगंधा खुले यांना फोन केला होता. या संभाषणात वाल्मिकनं थेट मी बीडचा बाप असल्याचं सांगत कायदा सुव्यवस्थेची लक्तरच वेशीला टांगल्याचं दाखवलंय. या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय संभाषण झालं ते पाहूयात.....
ऐकलंत....कराडची पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना कराडची ही भाषा केवळ त्याचा माजच दाखवत नाही तर थेट बीड पोलीस प्रशासनालाच आव्हान देणारी आहे. आणि त्यामुळेच भाजप आमदार सुरेश धस यांनी या क्लिपवरूनच मंत्री धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय....कराडशिवाय ज्यांचं पान हलत नाही त्या धनंजय मुंडेंचं या प्रकरणातलं पान कसं हललं असा थेट सवालच धस यांनी केलाय.
कराड सायबर सेलच्या ज्या महिला अधिकाऱ्याशी फोनवरून बोलला त्या निशिगंधा खुळे कोण आहेत ते पाहूयात...
कोण आहेत निशिगंधा खुले?
- गेवराई पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सध्या कार्यरत
- बीड सायबर सेलमध्ये पोलीस उपनिरिक्षक म्हणून कार्यरत होत्या
- लोकसभा निवडणुकीदरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करण्यांवर कारवाई केली
- कारवाई करु नये म्हणून कराडने फोन केला, त्याचीच ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप हे गंभीर प्रकरण असल्याचा दावा धस यांनी केलाय. विशेष म्हणजे मंत्री धनंजय मुंडेंचं कनेक्शनही त्यांनी या प्रकरणाला जोडलंय. त्यामुळे आता हे प्रकरण केवळ सोशल मीडियाच्या पोस्टविरोधात कारवाई मागे घेण्यापुरतंच आहे की आणखी काही? असा प्रश्न आता निर्माण झालाय. मात्र सर्वात धक्कादायक म्हणजे वाल्मिकनं स्वत:ला बीडचा बाप घोषित करून पोलीस व्यवस्थेलाच आव्हान दिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.