Walmik Karad Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Bajarang Sonawane On Walmik Karad: तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडबाबत खासदार बजरंग सोनावण यांनी खळबळजनक आरोप केला आहे. माझ्या मुलाला विलास घुले हत्या प्रकरणात अडकवण्यासाठी वाल्मिक कराडचे प्रयत्न सुरू आहेत.

Priya More
  • वाल्मिक कराडने तुरुंगातून फोन केल्याचा बजरंग सोनवणेंचा दावा

  • विलास घुले हत्या प्रकरणात सौरभ सोनवणेला अडकवण्याचा कट

  • बजरंग सोनवणेंनी पत्रकार परिषदेत ऐकवली ऑडिओ क्लिप

  • वाल्मिक कराडच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

बीडमधील विलास घुले यांच्या हत्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. वाल्मिक कराडने तुरूंगातून फोन करून माझा मुलगा सौरभला विलास घुले प्रकरणात अडकवण्याचे आदेस दिले, असा आरोर खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. वाल्मीक कराडचा कारागृहातून बाहेर फोन आला असल्याचा दावा करत बजरंग सोनवणे यांनी भर पत्रकार परिषदेत थेट कॉल रेकॉर्डिंग ऐकवली.

खासदार बजरंग सोनवणेच्या पोराला विलास घुले खून प्रकरणात अडकवा, त्याच्यावर गुन्हा दाखल कर. विलास घुलेचा मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवा, टाकीवर चढा तुला भगवान बाबाची शपथ पण त्या गाबड्याला अडकवा असं वाल्मीक कराड या फोन रेकॉर्डिंगमध्ये बोलत असल्याचे ऐकू येत आहे. या रेकॉर्डिंगमध्ये समोरची व्यक्ती जी आण्णा जी आण्णा असं म्हणत आहे.

केज तालुक्यातील टाकली फाट्यावर असलेल्या हॉटेलबाहेर विलास घुलेची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडामागे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत.

वाल्मीक कराडने सग्रीव कराडसोबत फोनद्वारे काय संवाद -

वाल्मीक कराड - हॅलो काय चाललंय? सुग्रीव भाऊ बर आहे का?

सुग्रीव कराड - हो.

वाल्मीक कराड - त्या प्रकरणांमध्ये त्यांना सोडू नका.

सुग्रीव कराड - आदेश सांगा फक्त अण्णा.

वाल्मीक कराड - त्या बाकीच्यांवरती केसेस करावे लागत आहेत.

वाल्मीक कराड - तुझे आणि माझे चांगले संबंध आहेत त्या गाबड्यामुळे माझ्या घुसमट गुंतून ठेवले आहे.

वाल्मीक कराड - त्या माय घाल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे

सुग्रीव कराड - पीआय गुन्हा दाखल करून घेत नाहीत तो आय घालत आहे.

सुग्रीव कराड - आम्ही पोलीस स्टेशन मध्येच आहोत.

वाल्मीक कराड - तुझ्या मनातला काही राग दोष असेल तर काढून टाक आपण सगळे एक आहोत.

वाल्मीक कराड - आपण एक आहोत आपल्यामध्ये भगवान बाबांचे रक्त आहे.

वाल्मीक कराड - तुला हात जोडतो विनंती करतो.

सुग्रीव कराड - हो हो तुम्हाला झालं की कळवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

SCROLL FOR NEXT