Wai Assembly Constituency  Saam tv
महाराष्ट्र

Wai Assembly Constituency : वाईच्या मैदानात तिरंगी सामना; बंडखोरीचा फटका कुणाला बसणार, समीकरण कसंय? वाचा सविस्तर

wai assembly constituency News : वाईच्या मैदानात तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे. तर या मतदारसंघात बंडखोरी देखील झाली आहे. या मतदारसंघात समीकरण कसं आहे, जाणून घ्या.

Vishal Gangurde

भरत मोहळकर, साम टीव्ही

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय.. त्यातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यापार्श्वभुमीवर वाईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विद्यमान आमदार मकरंद पाटलांना तर शरद पवारांनी अरुणादेवी पिसाळांना संधी दिलीय.. तर शिंदे गटाच्या पुरुषोत्तम जाधवांनी बंडखोरी करत निवडणुकीतील चुरस वाढवलीय. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय..

पुरुषोत्तम जाधवांना वाईतून 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत 35 आणि 25 हजार मतं मिळाले होते. मात्र यंदा विधानसभेच्या रिंगणात उतरताच लोकं घराणेशाहीला नाकारतील, असा विश्वास पुरुषोत्तम जाधवांनी व्यक्त केलाय.

जाधवांनी वाढवलं महायुती-मविआचं टेंशन

जनता दलाचा बालेकिल्ला असलेला वाई मतदारसंघ 2009 मध्ये अपक्ष असलेल्या मकरंद पाटलांनी भेदला. त्यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवताना मकरंद पाटलांच्या मताधिक्यात वाढ होत गेली. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत. मात्र 2019 मधील मतांचं समीकरण कसं होतं? पाहूयात...

2019 मधील मतांचं गणित

मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस - 1 लाख 30 हजार 486 मतं

मदन भोसले, भाजप, 86 हजार 839 मतं

43 हजार 647 मतांनी मकरंद पाटलांचा विजय

अरुणादेवी पिसाळ या माजी मंत्री मदन पिसाळांची सून तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यांचा मोठा गट वाईत कार्यरत आहे.मात्र लोकसभेला मकरंद पाटलांनी शशिकांत शिंदेंचं लीड 6 हजारांवर रोखलं. त्याची भाजप किती ताकदीने परतफेड करणार? यावर मकरंद पाटलांचा विजयाचं गणित अवलंबून असेल. तर जाधवांची बंडखोरी कुणाला भोवणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT