लातुरात VTS यंत्रणा कार्यान्वित, 504 बसेसची माहिती कळणार एका क्लिकवर
लातुरात VTS यंत्रणा कार्यान्वित, 504 बसेसची माहिती कळणार एका क्लिकवर SaamTv
महाराष्ट्र

लातुरात VTS यंत्रणा कार्यान्वित, 504 बसेसची माहिती कळणार एका क्लिकवर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दीपक क्षीरसागर

लातूर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोईसाठी 'व्हिटीएस' अर्थात 'व्हेइकल ट्रैकिंग सिस्टम' (VTS) ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. लातूर विभागात 504 बसेसमध्ये व्हिटीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून यामुळे प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

या प्रणालीमुळे प्रवाशांना आता बससाठी स्थानकावर जास्त वेळ खर्च करून ताटकळत बसावे लागण्याचा त्रास कमी होणार असून बसचे लाईव्ह लोकेशन कळणार आहे. VTS system in operation in Latur, information of 504 buses will be known on a click

हे देखील पहा -

राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी 'लालपरी' ला हायटेक करत असून प्रत्येक बसमध्ये व्हिटीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. यामाध्यमातून एसटीच्या प्रवाशांना आपल्या बसचे लाईव्ह लोकेशन तात्काळ समजणार आहे.

बसस्थानकातून गाडी सुटल्यानंतर प्रवासादरम्यानच्या प्रत्येक हालचालीवर या सिस्टीमद्वारे नियंत्रण ठेवता येणार आहे. लातूर विभागात एकूण 504 बसेस मध्ये व्हिटीएस ट्रेकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे.

यामुळे गाडीच लोकेशन, वेग, थांबा यासंबंधीची इत्यंभूत माहिती प्रवाशांना या प्रणाली द्वारे एका क्लिकवर कळणार असून अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून लालपरी अपडेट होणार आहे. प्रवासादरम्यान चालक, वाहक हलगर्जीपणा करत असेल तर त्यासंबंधीची 'वॉर्निंग बेल' बसस्थानकात तात्काळ वाजणार आहे.

शिवाय बसचा अधिकृत थांबा नसताना जर बस थांबली तर त्याची 'अलर्ट टोन' देखील येणार आहे. प्रणालीतील या आधुनिक बाबींमुळे चालक-वाहकांच्या निष्काळजीपणालाही चाप बसणार आहे. अशी माहिती लातूरचे विभागीय वाहतूक नियंत्रक अभय देशमुख यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT