प्राध्यापकांची भरती प्रक्रिया लवकरच राबवू - उदय सामंत

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त पदांची भरती कोविड परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर प्राधान्य क्रमाने केली जाईल अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज अमरावती येथे बोलतांना दिली.
प्राध्यापकांची भरती प्रक्रिया लवकरच राबवू - उदय सामंत
प्राध्यापकांची भरती प्रक्रिया लवकरच राबवू - उदय सामंतअरुण जोशी
Published On

अमरावती - राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील Engineering College रिक्त पदांची भरती Recruitment of Vacancies कोविड परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर प्राधान्य क्रमाने केली जाईल अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Minister of Higher and Technical Education उदय सामंत uday samant यांनी आज अमरावती येथे बोलतांना दिली. शिवसेना नेते shivsena leader आणि राज्याचे पर्यावरण मंत्री Minister of Environment आदित्य ठाकरे aditya thackeray यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्ह्याकरिता amravati district भेट देण्यात आलेल्या वेंटीलेटरच्या हस्तांतरण कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत press conference त्याची हि माहिती दिली.

हे देखील पहा -

कोविडच्या प्रादुर्भावामुळे तूर्तास राज्यातील पदभरती Vacancies शक्य नाही मात्र ही महामारी आटोक्यात येताच सर्वच उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापकांच्या जागा भरण्यात येतील, तशी परवानगी वित्त विभागाकडून Department of Finance मिळताच या जागा भरण्यात येतील अशी माहिती सामंत यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील विद्यापीठ, महाविद्यालय, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी यांच्या सुविधेसाठी 'उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय अमरावती' हा उपक्रम पुढील महिन्यापासून आपण सुरु करणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमामुळे पालक, विद्यार्थी तसेच शिक्षण विभागातील कर्मचारी यांना आपल्या कामानिमित्त वारंवार मुंबईला मंत्रालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण अमरावतीमध्येच होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून होत असलेल्या शुल्क वसुली बाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने एक समिती तयार करण्यात आली असून हि समिती येणाऱ्या १५ दिवसांत विद्यार्थी, पालक आणि खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयं यांच्यात सुवर्णमध्य साधून तोडगा निश्चित काढेल असं उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com