yashomati thakur & bacchu kadu election 2022
yashomati thakur & bacchu kadu election 2022 saam tv
महाराष्ट्र

Election 2022: तिवसात यशाेमती ठाकूर, संग्रामपूरात बच्चु कडूंची आज परीक्षा; उद्या निकाल

अरुण जोशी, भारत नागणे, संजय जाधव

अमरावती : ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या राज्यातील नगरपंचायती व जिल्हा परिषदेच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये थंडीच्या कडाक्यात देखील मतदार मतदानासाठी घराच्या बाहेर पडले आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सत्ताधारी महाविकास आघाडी (mva) विरुद्ध भाजप (bjp) अशी लढत दिसून येत आहे. (voting begins in amravati buldhana solapur for nagarpanchayat election 2022)

बुलढाणा जिल्ह्यात आज मोताळा आणि संग्रामपूर या दोन नगरपंचायती (nagar panchayat election) मधील ओबीसीसाठीच्या जागांवर मतदान सुरु झालं आहे. मोताळा आणि संग्रामपूर या दोन्ही नगरपंचायतीत प्रत्येकी १७ जागा असून दाेन्ही ठिकाणी १३ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान झाले आहे. दोन्ही ठिकाणी ओबीसींच्या उर्वरित ४ जागांवर आज मतदानाला सुरुवात झाली आहे. संग्रामपूर नगरपंचायतमध्ये 9 वाजेपर्यंत 12 टक्के मतदान झाले आहे. मोताळा येथे 9 वाजेपर्यंत नगरपंचायत निवडणुकीत मतदान 20 टक्के झाले आहे. सर्व जागांची एकत्रित मतमोजणी उद्या (बुधवार, ता. १९) केली जाणार आहे.

बच्चू कडूंची प्रतिष्ठापणास

या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांचा प्रहार जनशक्ती पक्ष पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर नगर पंचायतीच्या सर्व १७ जागांवर निवडणूक लढवीत असल्याने या निवडणुकीत कडू यांची प्रतिष्ठापणास लागली आहे. मोताळा येथील नगरपंचायतमध्ये काँग्रेस व शिवसेना यांच्यात सरळ लढत होत आहे. उद्या मतमोजणी नंतर जनतेने कोणाला कौल दिला हे कळेल. मतदाना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तिवसा, भातकुलीत मतदान सुरु

अमरावती जिल्ह्यातील तिवसा व भातकुली या दोन नगरपंचायतीसाठी सकाळी साडे सात वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. २१ डिसेंबरला अमरावती जिल्ह्यातील तिवसा व भातकुली या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निकाला निकालानंतर ओबीसीच्या जागा या खुल्या प्रवर्गातून लढवण्यास सांगितल्यामुळे ओबीसी जागेवर आता खूला प्रवर्गातील उमेदवार हे रिंगणात आहेत. तिवसा नगरपंचायतसाठी एकूण तीन जागेसाठी १३ उमेदवार रिंगणात आहे. भातकुली नगरपंचायतसाठी एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत.

यशोमती ठाकूर यांची प्रतिष्ठापणास

अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगर पंचायतीची निवडणुक ही राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांच्या मतदारसंघातली आहे. त्यामुळे मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. एकंदरीत बघितलं तर कोरोनाच्या सावटाखाली ही निवडणूक होत आहे .सकाळी थंडी असल्याने मतदान केंद्रावर मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळाला.

उद्या मतमोजणी

उद्या सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून यात बाजी कोण मारेल ते उद्या समजेल. मात्र या प्रचारामध्ये खुद्द मंत्री यशोमती ठाकूर, जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा , भाजप नेते अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला त्यामुळे मतदार राजा नेमका यावेळी कोणाला कौल देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीसाठी मतदान‌

सोलापूर (solapur) जिल्ह्यातील माढा, माळशिरस, श्रीपूर- महाळुंग, वैराग, नातेपुते या पाच नगरपंचायतीच्या १९ जागांसाठी मतदानाला आज सकाळी प्रारंभ झाला आहे. यामध्ये माळशिरस येथे ताई सचिन वावरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे १९ जागांसाठी ८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Today's Marathi News Live: ४ जूननंतर अच्छे दिनाची सुरुवात होईल - उद्धव ठाकरे

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

Chardham Yatra Bus Accident | बुलढाण्यातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसला भीषण आग

Soami Bagh Mausoleum : सेम टू सेम ताजमहालच! बांधकामाला १०० हून अधिक वर्षांचा काळ; पर्यटकांचं ठरतंय आकर्षण

SCROLL FOR NEXT