Election 2022: देहू, हिंगाेली, शहापूरात मतदानास प्रारंभ; थंडीतही केंद्रावर रांगा

राज्यातील विविध जिल्ह्यात आज मतदानास प्रारंभ झाला आहे.
Nagar panchayat election 2022 voting begins
Nagar panchayat election 2022 voting beginsSaamTV

दिलीप कांबळे, फैय्याज शेख, संदीप नागरे

मावळ : तीर्थक्षेत्र देहूच्या नगरपंचायतीची पहिली निवडणूक आज पार पडत आहे. एकूण सतरा वॉर्ड पैकी तेरा वॉर्डची मतदान प्रक्रिया डिसेंबरमध्ये पार पडली. ओबीसी आरक्षणामुळे चार वॉर्डच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. त्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देहूकरांमध्ये (dehu) त्यामुळे प्रचंड उत्सुकता पहायला मिळत आहे. उमेदवार आणि मतदार असे सगळेच मतदान केंद्रावर गर्दी करत आहेत. देहूमध्ये प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. आणि पहिल्याच टप्प्यात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचं चित्र आहे. (dehu hingoli shahpur nagar panchayat election 2022 voting begins)

हिंगोलीत मतदानास प्रारंभ

औंढा व सेनगाव नगर पंचायत मधील उर्वरित प्रत्येकी चार जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी साडे सात वाजता या मतदानाला सुरुवात करण्यात आली असून मतदान केंद्रावर थंडीच्या कडाक्यात देखील मतदारांनी रांगा लावल्याच पाहायला मिळालं. दरम्यान मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस दलाने मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

शहापूरात मतदान सुरु

शहापूर नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी दहा उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने चार, शिवसेनेने चार तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केला आहे. येथे खरी लढत भाजप सेनेत आहे .

शहापूर नगरपंचायतीसाठी २१ नोव्हेंबरला १३ जागांसाठी मतदान झाले हाेते. OBC च्या ४ जागेंवर स्थगती होती. याच चार जागांवर आज मतदान होत आहे. उद्या मतमोजणीची प्रकिया पार पडणार आहे.

Nagar panchayat election 2022 voting begins
Election 2022: भंडारा गोंदियात मतदानास प्रारंभ; पटाेले, पटेल, मेंढेंची प्रतिष्ठापणास
Nagar panchayat election 2022 voting begins
Nagar panchayat Election: नाशिक जिल्ह्यातील 4 नगरपंचायतींच्या 8 जागांसाठी मतदानाला सुरुवात
Nagar panchayat election 2022 voting begins
Election 2022: रायगडात २१ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात; मतदानास प्रारंभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com