Nagar Panchayat Election: नाशिक जिल्ह्यातील 4 नगरपंचायतींच्या 8 जागांसाठी मतदानाला सुरुवात

Nagar panchayat Election In Nashik: न्यायालयाने आरक्षण रद्द केलं आणि या जागांवर खुल्या गटातून उमेदवार निवडणूक लढवू शकतात असा निर्णय घेण्यात आला.
Nagar panchayat Election In Nashik
Nagar panchayat Election In NashikSaam Tv News

नाशिक: जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्ह्यातील 4 नगरपंचायतीच्या 11 जागांवर पहिल्या टप्प्यात निवडणूक घेता आली नव्हती. त्यानंतर न्यायालयाने आरक्षण रद्द केलं आणि या जागांवर खुल्या गटातून उमेदवार निवडणूक (Election) लढवू शकतात असा निर्णय घेण्यात आला. या 11 जागांपैकी 3 जागा बिनविरोध झाल्यानं दुसऱ्या टप्प्यात आज जिल्ह्यातील 4 नगरपंचायतींच्या 8 जागांसाठी मतदान पार पडतंय. (Nagar panchayat Election In Nashik News Updates)

Nagar panchayat Election In Nashik
Election 2022: रायगडात २१ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात; मतदानास प्रारंभ

यामध्ये निफाड नगरपंचायतीच्या 2, देवळा 2, दिंडोरी 3 आणि कळवण नगरपंचायतीच्या एका जागेचा समावेश आहे. या 8 जागांसाठी एकूण 20 उमेदवार रिंगणात असून उद्या दोन्ही टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उद्या पहिल्या टप्प्यातील 292 आणि दुसऱ्या टप्प्यातील या 20 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com