सातारा : प्रा. डॉ. एन. डी. पाटील (n d patil) यांच्या निधनाने (n d patil passes away) महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपल्याची भावना ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी व्यक्त केली आहे. (sharad pawar ajit pawar supriya sule udayanraje bhosale pays tribute to n d patil)
पवार म्हणाले उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले. शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्या एन. डी. पाटील (n d patil) यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही.
खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) म्हणाल्या समाजातील शोषित-वंचितांचा आवाज असणारे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न समतावादी विचारांची पेरणी करणारे असंख्य विद्यार्थी घडविले. विविध सामाजिक चळवळींत ते आयुष्यभर सक्रीय राहिले. शेतकरी, शेतमजूर, कामगार, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेकदा रस्त्यावर उतरुन लढा दिला. संविधान आणि फुले-शाहू-आंबेडकरी विचारांशी ते आयुष्यभर एकनिष्ठ राहिले.
समाजातील सर्व प्रागतिक व पुरोगामी विचारांच्या चळवळींच्या व कार्यकर्त्यांच्या मागे ते नेहमीच भक्कमपणे उभे राहिले. सातत्याने अभ्यास, वाचन, चिंतन आणि लेखन हा त्यांच्या वैचारिक जडणघडणीचे मर्म होते. गेले काही दिवस ते आजारी होते. या काळात देखील त्यांचं वाचन सुरु होतं. त्याचं केवळ असणं देखील खुप आश्वासक आणि प्रेरणादायी होतं. त्यांच्या निधनामुळे देशाच्या सामाजिक विश्वात खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला
उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) म्हणाले महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी
प्रा. एन. डी. पाटील साहेब निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे.
शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केलं. आमदार म्हणून काम केलं. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. प्रा. एन. डी. पाटील साहेब हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचं निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.
खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी शेतकरी, आदिवासी, कष्टकरी बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांचा आधारवड आज खऱ्या अर्थाने कोसळला अशी भावना व्यक्त केली आहे.
माजी मंत्री एन डी पाटील यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे आणि अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे एक ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते आज आपल्यातून निघून गेले अशी भावना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.