सातारा : महाराष्ट्रातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील (n d patil) यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. महाराष्ट्राच्या विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेशी कटिबद्ध राहिले अशी भावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. (maharashtra leaders pays tribute to seinor leader n d patil kolhapur latest news)
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर संपुर्ण महाराष्ट्र हळहळत आहे. नेत्यांसह सामान्य नागरिक एन.डी. यांच्या आठवणीने गहिवरत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) म्हणाले माझे त्यांच्याशी (jayant patil along with n d patil) अत्यंत कौटुंबिक असे संबंध होते. महाराष्ट्राने जन सामान्यांसाठी लढणारा एक योद्धा कायमचा गमावला आहे.
काॅंग्रेस नेते अशाेक चव्हाण (ashok chavan) यांनी ए.डी. पाटील हे विधीमंडळातील आणि चळवळीतील धडाडती तोफ होती. त्यांच्या रूपात शेतकरी व कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले कष्टकरी मराठी माणसाच्या हितासाठी जगणारा एक संघर्षशील नेता आपण गमावला आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दरेकर (pravin darekar) यांनी असामान्य व्यक्तिमत्त्व आज हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी एन.डी.पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा आधारवड हरपला अशी भावना व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार राेहित पवार (rohit pawar) यांनी ही वार्ता मन हेलावून टाकणारी आहे. राज्यातील सामाजिक चळवळींचा अग्रणी आपण गमावल्याची भावना मनात दाटून येतेय. कोल्हापूरला गेलो असताना प्रा. एन. डी. पाटील सर आणि सरोज आत्यांची भेट घेतली नाही, असं कधीही झालं नाही असे नमूद केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.