Chardham Yatra Bus Accident | बुलढाण्यातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसला भीषण आग

बुलढाण्यातून चारधाम यात्रेसाठी भाविक बसमधून निघाले होते. तेव्हा या बसला आग लागली. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. धामणगाव बढे येथून चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या 2 लक्झरी बस पैकी एका बसला आग लागली.

बुलढाणा : बुलढाण्यातून चारधाम यात्रेसाठी भाविक बसमधून निघाले होते. तेव्हा या बसला आग लागली. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. धामणगाव बढे येथून चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या 2 लक्झरी बस पैकी एका बसला आग लागली. मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस नजीक 17 मेच्या दुपारी 2 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे संपूर्ण बस जळून खाक झाली. दरम्यान समय सुचकता राखत सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडल्याने बचावले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com