sangli crime news, youth, arrests, vita police saam tv
महाराष्ट्र

Sangli News : आलिशान कार चोरणाऱ्या युवकास भाेसरीत अटक, विटा पाेलिसांची कामगिरी

गुन्हे प्रकटीकरण पथकाला चोरट्यांना शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

विजय पाटील

Vita Police News : सांगली जिल्ह्यात आलिशान कार चोरणाऱ्या सराईत चाेरट्यास पाेलिसांनी अटक केली आहे. ही कामगिरी विटा पोलिसांनी बजावली आहे. संशयिताकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पाेलिस निरीक्षक संताेष डाके यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra News)

विटा पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रोहन बिरू सोनटक्के (वय २१, राहणार मुरूम, जिल्हा. उस्मानाबाद (धाराशिव) असे अटक (arrests) केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून पावणेनऊ लाख रूपये किमतीची कार जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार २४ ऑगस्टला विट्यातील एनएस आटो केअर येथून एक आलिशान कारची चोरी झाली हाेती. त्याबाबतची तक्रार संतोष भोईटे यांनी दिली होती. अज्ञातांवर गुन्हा दाखल केल्यानंतर पाेलिस निरीक्षक डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला चोरट्यांना शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या.

भाेसरीतून संशियतास घेतले ताब्यात

पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तसेच तांत्रिक तपास करत संशयित भोसरी (पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली. पाेलिसांच्या पथकाने तेथे सापळा रचून संशयितास कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिल्याची माहिती संतोष डोके यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंघोळ कधी वापरतात माहितीये का? तुम्हीही चुकीचा शब्द वापरताय

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

SCROLL FOR NEXT