विश्वास नांगरे पाटील अडचणीत येण्याची शक्यता; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल Saam Tv
महाराष्ट्र

विश्वास नांगरे पाटील अडचणीत येण्याची शक्यता; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार मध्ये असलेले ग्रामविकासमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ याच्या विरोधात घोटाळ्याचे आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार मध्ये असलेले ग्रामविकासमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ याच्या विरोधात घोटाळ्याचे आरोप केले होते. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी काही दिवसांअगोदर कोल्हापूर पोलीस स्थानकात तक्रार करण्याकरिता जाणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी त्यांना मुंबई बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आलेला होता.

या प्रकरणावरून आता राज्यामधील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. यातच आता मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आपल्या पदाचा गैरवापर करुन, महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत. याच द्वेषामधून त्यांनी मला ६ तास घरात कोंडून ठेवल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हे देखील पहा-

यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी विश्वास नांगरे पाटलांविरोधामध्ये आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत सोमय्यांनी सांगितले आहे की, कोल्हापूरला जात असताना मला मुंबई मध्ये रोखले होते. तसेच मला घरात डांबून ठेवण्यात आले होते. या घोटाळेबाजांना वाचवण्याकरिता नांगरे पाटील यांनी पदाचा गैरवापर केला आहे.

यावर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सरकारी अधिकाऱ्यांसंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली असेल, त्यासंदर्भात सर्वप्रथम राज्य सरकारला विचारणा करुन, कृती अहवाल मागविला जाणार असल्याची माहिती दिली आहे. डॉ. मुळे पुढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांची तक्रार अद्याप माझ्यापर्यंत पोहचली नाही.

माझ्याशिवाय ती अन्य सदस्यांकडे देखील येऊ शकते. परंतु, एका शासकीय अधिकाऱ्यांविरोधात ही तक्रार असल्यामुळे त्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला काय कारवाई झाली याबाबच अहवाल मागितला जाणार आहे. त्यांनतरचं प्रकरण आयोगाकडून हाताळले जाणार आहे.

दरम्यान सोमय्या यांनी दिल्लीत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात घोटाळ्याची माहिती देखील दिली आहे. मुश्रीफ यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून आपल्या जावयाला कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

SCROLL FOR NEXT