CM Eknath Shinde Speech PM Vishwakarma Programme Wardha:  Saamtv
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: PM मोदींचे तोंडभरुन कौतुक, विरोधकांवर निशाणा, वर्ध्यातील कार्यक्रमात CM शिंदेंची फटकेबाजी; वाचा सविस्तर...

CM Eknath Shinde Speech PM Vishwakarma Programme Wardha: मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा विकासाच्या नव्या स्तरावर पोहोचतो आहे. बुलेट ट्रेनच्या वेगाने महाराष्ट्राचा विकास मोदींच्या नेतृत्वाखाली होईल ,आपल्या पाठिमागे मोदीजी खंबीरपणे उभे आहेत, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Gangappa Pujari

गणेश कवाडे, ता. २० सप्टेंबर

CM Eknath Shinde Speech Wardha: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्धेत वर्षपूर्ती सोहळा, तसेच अमरावती येथील पीएम मित्रा पार्क, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा आज पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान मोदींसह राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित आहेत. वर्ध्यातील स्वावलंबी मैदान येथे होत असलेल्या या कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी PM मोदींचे तोंडभरुन कौतुक केले.

काय म्हणाले CM एकनाथ शिंदे?

"पंतप्रधान मोदी यांच्या १० वर्षाच्या कालखंडाबद्दल एवढेच सांगेन की, दस साल बेमिसाल, मोदीजी विकास की मिसाल. २१वे शतक हे भारताचे आहे, कारण देशात सत्तेवर नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदी हे विकासाची मिसाल आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाच्या प्रगतीचा आलेख तिप्पटीने वाढेल असा विश्वास आहे. जगातील सर्वात ताकदवान देशांच्या यादीत भारत वरच्या ठिकाणी असेल. ब्रँडिंग व मार्केटिंगमध्ये छोट्या छोट्या घटकांना सामावून घेण्याचा विचार त्यांनी सत्यात आणला. मोदीजी प्रत्येक विभाग व क्षेत्रास मुख्य प्रवाहात आणत आहेत," असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक केले.

विश्वकर्मा योजनेतून रोजगाराचा प्रयत्न...

"विश्वकर्मा योजनेला वर्ष पूर्ण झाले. लोकांना रोजगार देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विश्वकर्मा योजनेतून लाखो लोकांना मदत झाली. सब का साथ , सब का विकास हा त्यांचा हेतू आहे. प्रत्येक छोट्या छोट्या घडकाचा ते विचार करतात. या योजनेच्या वर्षपूर्ती निमित्ताने मी आभार मानतो. आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरु करत आहे. महिलांना १ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. टेक्सटाईल प्रकल्प हा ८ हजार कोटींचा प्रकल्प आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराचा मेकओव्हर होईल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

विरोधकांवर निशाणा..

"तिसऱ्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था करण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत घेत आहोत. जगभरात देशाचा मान मोदींनी वाढवला, तसेच दहशतवादी निधीला त्यांनी रोख लावला. पण आपल्यातले काही लोक बाहेरील देशात जाऊन देशाची बदनामी करत आहे , संविधान रद्द करण्याची भाषा बोलत आहेत. पण नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत तोपर्यंत कुणी मायका लाल बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण रद्द करू शकत नाही," असा टोलाही मुख्यमंत्री शिंदेनी लगावला.

"वन नेशन वन इलेक्शनच्या निर्णयाचे स्वागत करतो. काही जण काश्मीर मध्ये ३७० कलम रद्द करण्याची भाषा करत आहेत. आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही महिन्याला दीड हजार रुपये जमा करत आहोत. अन्नपूर्णा योजना असेल, मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा विकासाच्या नव्या स्तरावर पोहोचतो आहे. बुलेट ट्रेनच्या वेगाने महाराष्ट्राचा विकास मोदींच्या नेतृत्वाखाली होईल ,आपल्या पाठिमागे मोदीजी खंबीरपणे उभे आहेत, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT