Virar News Saam Digital
महाराष्ट्र

Virar News : केंद्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला बजावली नोटीस; या प्रकरणाबाबत चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश

Central Human Rights Commission : मुंबईतील विरारमध्ये सांडपाणी प्रकल्पाची साफसफाई करताना चार सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याबाबत केंद्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

Sandeep Gawade

मुंबईतील विरारमध्ये सांडपाणी प्रकल्पाची साफसफाई करताना चार सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याची दखल केंद्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. साफसफाईचं कास सुरू असताना झालेल्या निष्काळजीपणाबाबत आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

गुढीपाडव्या दिवशीचं सकाळी साडेअकराच्या सुमारास विरारमध्ये रूस्तमजी बिल्डरच्या एका सांडपाणी प्रकल्पाची नियमित साफसफाई आणि काही तांत्रिक दुरुस्तीसाठी चार सफाई कामगार टाकीत उतरले होते. प्रकल्पात उतरलेला एक कामगार बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी इतर ३ कामगार टाकीत उतरले. मात्र तेही बाहेर आले नाहीत. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर चारही सफाई कर्मचाऱ्यांचा टाकीत गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आलं.

हे सर्व सफाई कामगार 28 ते 30 या वयोगटातील होते. त्याचबरोबर अमोल घाटाळ आणि निखिल घाटाळ हे सख्खे भाऊ होते. कामात निष्काळी केल्याबद्दल या घटनेनंतर सांडपाणी प्रकल्पाचे कंत्राट दिलेल्या पॉलीकॉन कंपनीच्या महेश कुपटे अर्नाळा सागरी पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. महेश कुपटे यांच्यावर कामाच्या देखरेखीची जबाबदारी होती, असं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे याची दखल थेट केंद्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली असून राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. येत्या चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT