हा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश आहे.. विरार दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीय़ांचा... विरार पूर्वेकडील रमाबाई अपार्टमेंट ही बिल्डींग, 27 जुलैला मध्यरात्री या बिल्डींगचा चौथा मजला अचानक कोसळला....इमारतीच्या आवारातच असलेल्या चाळींवर हा भाग पडला.. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यु झाला..आणि तब्बल 46 तासानंतर हे बचावकार्य संपलं...
यातील काही जखमींवर उपचार सुरू आहेत.. मुख्यंमंत्र्यांनी ही घटना दुदैवी असल्यांच म्हटलय,राज्यसरकारनं मृतांच्या नातेबाईकांना पाच लाखांची मदतही जाहीर केलीय..आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनानी जाऊन घटनास्थळाला भेटही दिली.... पोलिसांनीही कार्यतत्परता दाखवून या अनधिकृत इमारतीच्या बिल्डरलाही ताब्यात घेतलंय.. मात्र या सगळ्या यंत्रणा दुर्घटनेनंतर जाग्या झाल्या आहेत...पण प्रश्न उरतो की या 17 निष्पापांचे मारेकरी कोण...?
रमाबाई अपार्टमेट ही 2010 मध्ये बांधण्यात आली होती...अवघ्या 15 वर्षात कोसळलेली ही इमारत अनधिकृत होती...केवळ रमाबाईच नव्हे तर वसई-विरारमध्ये अशा अनेक अनधिकृत इमारतींचं पेव फुटलय..आणि या अनधिकृत बांधकामांच्या जाळ्यात निष्पाप नागरिक अडकत चाललेत.
41 अनाधिकृत इमारतींवर झालेल्या तोडक कारवाईनं हजारो कुटुंबांना बेघर व्हावं लागलं होतं. त्यात आता विरारमधील दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या अनाधिकृत चाळींवरही कारवाई करण्यात आलीय... त्यामुळे नागरिकांसमोर अनेक प्रश्न उभे राहिलेत...
आधी सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी मिळून अनाधिकृत बांधकामांना अभय द्यायचं, लाखो, करोडोंचा भ्रष्टाचार करायचा आणि मग अनाधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करायची अशीच वसई-विरारमधील कार्यपद्धती राहिलीय... गावखेड्यातून, इतर राज्यातून वसई विरारमध्ये परवडणाऱ्या घरांच्या शोधासाठी अनेक जण येत असतात. मात्र तिसरी मुंबईची स्वप्न ज्या वसई, विरारमध्ये रंगवली जातायत.. तिथलीच भ्रष्टाचारी य़ंत्रणा निष्पापांच्या जीवावर उठल्याचं रमाबाईच इमारतीच्या दुर्घटनेनं अधोरेखित होतयं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.