रोहिदास गाडगे...
School Boy Viral video: सोशल मीडियावर लहान मुलांच्या बोबड्या बोलांचे, त्यांच्या बाललिलांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहून आपल्याला हसू आवरता येत नाही. सध्या अशाच एका शाळकरी मुलाच्या भाषणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमधील मुलाने लोकशाहीची अशी काही भन्नाट, जबरदस्त आणि खतरनाक पद्धतीने व्याख्या समजावली आहे, जी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा चला जाणून घेवू.. (Viral Video)
दोन दिवसांपूर्वी देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. देशभर शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच संचलनाचे आयोजन केले होते. याच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एका चिमुकल्याने केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे.
व्हिडिओमध्ये तो लोकशाहीची व्याख्या अशी काही समजावत आहे जी ऐकून शिक्षक, विद्यार्थ्यांसह उपस्थितांनाही हसू आवरत नसल्याचे दिसत आहे. (School Boy Speech)
काय आहे चिमुकल्याचं भाषण....
खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. मला लोकशाही खूप आवडते. या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करु शकता. भांडू शकता, दोस्ती करु शकता, प्रेमाने राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला, खोड्या करायला, रानात फिरायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते.
"असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत. कारण ते लोकशाही मानतात. पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझं नाव सरांना सांगतात. लोकशाहीची मूल्ये आतंकवादी जसे पायदळी तुडवतात तसे सर मला कधी कधी पायदळी तुडवतात.
"कधी कधी कोंबडा बनवतात आणि म्हणतात तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही. तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तालुक्यात शोधून सापडणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जय लोकशाही,"
या चिमुकल्याच्या तुफान भाषणाच्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणत्या शाळेमधील आहे याबद्दल काही माहिती समोर आली नाही, मात्र नेटकऱ्यांना लोकशाहीची व्याख्या मात्र चिमुकल्याने जबरदस्त भाषेत समजावली आहे. (Social Media)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.