Sukhoi 30- Mirage 2000 Aircraft Crashed : हवाई दलाची सुखोई -३०, मिराज २००० लढाऊ विमाने कोसळली, भीषण अपघाताचा VIDEO पाहा

Sukhoi 30- Mirage 2000 Aircraft Crashed : मध्य प्रदेशात हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानांना भीषण अपघात झाला. सुखोई -३० आणि मिराज - २००० ही लढाऊ विमाने कोसळली.
Sukhoi 30- Mirage 2000 Aircraft Crashed
Sukhoi 30- Mirage 2000 Aircraft CrashedANI
Published On

Sukhoi 30- Mirage 2000 Aircraft Crashed In Madhya Pradesh : राजस्थानच्या भरतपूरमध्ये चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना ताजी असतानाच, मध्य प्रदेशात हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानांना भीषण अपघात झाला. मुरैना येथे शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. सुखोई -३० आणि मिराज - २००० ही लढाऊ विमाने कोसळली.

या मोठ्या दुर्घटनेची माहिती मिळताच, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचावकार्य हाती घेतले आहे. संरक्षण विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही लढाऊ विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या हवाई तळावरून उड्डाण भरलं होतं. सराव सुरू असतानाच हा अपघात झाला.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाच्या प्रमुखांकडून या दुर्घटनेबाबत माहिती घेतली आहे.

Sukhoi 30- Mirage 2000 Aircraft Crashed
IAF Plane Crash: एकाच दिवसात हवाई दलाची ३ विमानं कोसळली, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील दुर्घटना

एएनआयच्या वृत्तानुसार, भारतीय हवाई दलाची दोन लढाऊ विमाने (Sukhoi 30- Mirage 2000 Aircraft Crashed) मध्य प्रदेशात कोसळली. ही दुर्घटना मुरैना जिल्ह्यातील पहाडगढ विकासखंडच्या जंगलात घडली. आकाशातच या विमानांना आग लागली. ती दोन्ही विमाने जमिनीवर वेगाने कोसळली.

या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे पथक एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ही दोन्ही पथके घटनास्थळी पोहोचली. सुदैवाने या दुर्घटनेतून दोन्ही लढाऊ विमानांचे पायलट बचावले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Sukhoi 30- Mirage 2000 Aircraft Crashed
Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमान अपघात का होतात? समोर आलं धक्कादायक कारण

राजनाथ सिंह यांनी घेतला घटनेचा आढावा

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाच्या प्रमुखांकडून फोनवरून माहिती घेतली. या अपघाताची चौकशी करून त्याचा अहवाल तातडीने संरक्षण मंत्रालयाला देण्याचे आदेश दिल्याचे एएनआयच्या सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर बचावकार्य वेगाने राबवण्यात यावे, असे आदेशही राजनाथ सिंह यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com