Sangli, Islampur, qawwali , police saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News : कव्वाली कार्यक्रमात गाेळीबार ? व्हिडिओ व्हायरल, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

या घटनेचा तपास पाेलीस करणार का अशी चर्चा साेशल मिडियात हाेऊ लागली आहे.

विजय पाटील

Islampur : सांगली (sangli) जिल्ह्यात सध्या साेशल मिडीयात (social media) एक व्हिडिओ व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओत एक जण कव्वालीच्या (qawwali program in islampur) कार्यक्रमात व्यासपीठाच्या एका बाजूला जात हवेत गाेळीबार करीत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी संबंधित व्यक्तीस थांबावा अशी हातवारे करुन सूचना गाणं गाणारे करताना दिसत आहेत. या घटनेची नाेंद पाेलीस दल घेणार का अशी चर्चा देखील साेशल मिडीयात हाेऊ लागली आहे. (Islampur Latest Marathi News)

ही घटना इस्लामपूर येथील मोमीन मोहल्ला येथील असल्याचे समजते. कव्वाली कार्यक्रमात एक जण हवेत गोळीबार करीत असल्याची चर्चा रंगली आहे. हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने इस्लामपूरात खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

पैगंबर जयंतीनिमित्त ख्वाजा गरीब नवाज सोशल वेलफेअर ट्रस्टनं दहा ऑक्टोबरला आमिल आरिफ साबरी यांचा बज्मे कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला हाेता. या कार्यक्रमवेळी हा प्रकार घडल्याचे बाेलले जात आहे.

हजारोंच्या उपस्थितीत हा कव्वालीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी व्यासपीठावरुन हवेत गोळीबार करण्यात आला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हवेत गोळीबार करणारी व्यक्ती कोण आहे याचा किंवा व्हायरल व्हिडिओचा तपास पोलीस करणार का अशी विचारणा साेशल मिडियातून हाेऊ लागली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत १४ लाख बोगस मतदार? आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप|VIDEO

Maharashtra Nagar Parishad Live : नागपुरात लग्नसोहळा पार पडताच नवरीने केले मतदान

Maharashtra Live News Update: लोकसभेत 8 डिसेंबर रोजी वंदे मातरमच्या 150 व्या वर्षावर आणि 9 डिसेंबर रोजी निवडणूक सुधारणांवर चर्चा होणार

क्रीडा विश्वाला मोठा धक्का; माजी दिग्गज क्रिकेटपटूने घेतला जगाचा निरोप

Local Body Election : महाडनंतर रोह्यात वाद उफाळला; भाजप कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

SCROLL FOR NEXT