Satara News : नीरा नदी पात्रात सापडला पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह (पाहा व्हिडिओ)

अंधार पडल्याने कालची शाेध माेहिम थांबविण्यात आली.
Shashikant Ghorpade, Nira River, Satara, Pune, Mahableshwar Trekkers, shirwal
Shashikant Ghorpade, Nira River, Satara, Pune, Mahableshwar Trekkers, shirwalsaam tv

NDRF : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (Shashikant Ghorpade) यांचा मृतदेह आज (शुक्रवार) एनडीआरएफच्या (NDRf) पथकास नीरा नदी पात्रात हाती लागला. घाेरपडे यांचे मूळगाव तारगाव (ता. काेरेगाव) असून दाेन दिवसांपासून ते बेपत्ता हाेते. त्यांच्या कुटुंबियांनी पाेलिसांत धाव घेतल्यानंतर त्यांचे माेबाईलचे शेवटचे लाेकेशन नीरा नदी (nira river) नजीक दिसत हाेते. त्यानूसार पाेलिसांनी (police) गुरुवारी त्यांचा शाेध घेण्यास प्रारंभ केला हाेता. आज सकाळी पुन्हा शाेध माेहिम राबविण्यात आली. (Breaking Marathi News)

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी शिरवळ (shirwal) पोलिस ठाण्यात नाेंदवली. त्यानंतर निरा नदी पात्रात भोर येथील भोईराज जल आपत्ती निवारण पथक, महाबळेश्वर ट्रेकर्स, सातारा पोलिस व राजगड पोलिसांनी घाेरपडे यांना शाेधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अंधार पडल्याने कालची माेहिम थांबविण्यात आली हाेती. (Satara Latest Marathi News)

Shashikant Ghorpade, Nira River, Satara, Pune, Mahableshwar Trekkers, shirwal
Kass Pathar : पर्यटकांनी बहरलं 'कास'; पठारावरील फुलं हिरमुसली (पाहा व्हिडिओ)

दरम्यान आज (शुक्रवार) सकाळी एनडीआरएफच्या पथक नीरा नदी येथे दाखल झाले. या पथकानं घाेरपडे यांना शाेधण्यासाठी प्रारंभ केला. हे पथक आल्यानंतर नदी काठी ग्रामस्थांची गर्दी झाली हाेती. घाेरपडे यांचा मृतदेह पथकाच्या हाती लागला आहे अशी माहिती स्थानिक पाेलिसांनी साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Shashikant Ghorpade, Nira River, Satara, Pune, Mahableshwar Trekkers, shirwal
Chakan News : फिल्मी स्टाईलनं घेतला मित्राच्या खूनाचा बदला; १२ अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com