Akola Viral Video News Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video : सावधान! अकोल्यात बनतोय गटाराच्या पाण्यातून नाश्ता; Video पाहून तुम्हीही घाबराल

Akola Viral Video News : अकोल्यातील नाश्ता गाड्यांवर नाल्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे अन्न स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Alisha Khedekar

  • अकोल्यातील नाश्ता गाडीचा व्हिडिओ व्हायरल

  • नाल्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचा आरोप

  • सोशल मीडियावर नागरिकांचा संताप

  • स्वच्छतेवर गंभीर प्रश्न निर्माण

अक्षय गवळी, अकोला

चमचमीत खाणं कोणाला आवडत नाही. मात्र ते कुठे खावं याची काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं असतं. रस्त्यावर विकला जाणारा प्रत्येक पदार्थ हा कशा पद्धतीने बनवला जातो याची कल्पना आपल्याला नसते. या पदार्थांमुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. काही दिवसांपूर्वी मुंबईतील विरारमध्ये एका मासे विक्रेत्याने मास्यांवरती मच्छर मारण्याचा स्प्रे फवारल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता अकोल्यात नाल्याच्या पाण्याचा वापर करून चक्क पहाटेचा नाश्ता बनवला जात असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील धीग्रा चौकात असणाऱ्या बस स्थानक परिसरातील हा व्हिडिओ आहे. या चौकात पहाटे ४ वाजल्यापासून पोहे, समोसा, कचोरी नाश्त्याचे अनेक हात गाडीवर दुकाने थाटले जातात. या ठिकाणी अकोलेकरांची पहाटे मोठी गर्दी असते. मात्र, याच पोहे बनवणाऱ्या नाश्त्याच्या गाडीवर नाल्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

या नाश्त्याच्या हात गाडीवरील काम करणारा एक व्यक्ती हातात प्लास्टिकची बाटली घेत सांडपाण्याच्या नाल्यातून पाणी भरतानाचा हा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, आज सकाळी सात वाजताच्या सुमाराचा हा व्हिडिओ असल्याचे म्हटलं जात आहे. दरम्यान, या हात गाडीवर या पाण्याचा वापर नाश्ता बनवण्यासाठी अथवा नाश्त्याच्या प्लेट धुण्यासाठी होत आहेय का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर तीव्र संताप नास्ता विक्रेत्यांबाबत व्यक्त करण्यात येत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT