Akola Viral News Saam Tv
महाराष्ट्र

Akola : एका लग्नाची अजब गोष्ट! सोशल मीडियावर जुळल्या रेशीमगाठी, साडेतीन फूट नवरदेव आणि तीन फूट नवरीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

Akola Viral News : अकोल्यातील साडेतीन फूट नवरदेव आणि तीन फूट नवरीचा आगळावेगळा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावरून जुळलेली ओळख लग्नात परिवर्तित झाली.

Alisha Khedekar

  • अकोल्यातील अनोख्या जोडप्याचा विवाह चर्चेत

  • सोशल मीडियावरून ओळख, सिरोज येथे लग्न

  • अकोल्यात खंडेलवाल लॉन्स येथे भव्य रिसेप्शन

  • नातेवाईक आणि मित्रपरिवाराची मोठी उपस्थिती

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यातून एका लग्नाची अजब गोष्ट समोर आली आहे. या लग्नात साडे तीन फुटाचा नवरदेव, आणि ३ फुटाची नवरी. जिल्ह्यातील 'प्रतीक धानुका' आणि मध्य प्रदेशातील 'रेणुका' यांचा विवाह सोहळा सिरोज येथे पार पडला आहे. या आगळ्यावेगळ्या लग्नाची अकोल्यात चांगलीच चर्चा होताना दिसून येतं आहे.

लग्नानंतर काल रात्रीच अकोल्यातील शहरातील खंडेलवाल लॉन्स येथे त्यांच्या विवाहाचा भव्य रिसेप्शन सोहळा पार पडला. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. नवरदेव प्रतीक हा पुणे येथे आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तर नवरी ही सिरोज येथील शाळेवर लायब्ररीयन आहे.

दरम्यान, प्रतिक यांच्या कुटुंबियांनी लग्नासाठी रेणुकाच्या कुटुंबांकडं मागणी घातली, त्यानंतर रेणुकाच्या नातेवाईकांनी मुलगा पसंती असल्याचं सांगितलं. पुढं मध्यप्रदेशातील सिरोजमध्ये दोघांचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं. या लग्न सोहळामध्ये नातेवाईकांसह मित्रपरिवाराने मोठी हजेरी लावली होती. कालचं अकोल्यात प्रतिक आणि रेणुकाचा रिसेप्शन सोहळा आनंदायी वातावरणातं पार पडला. यावेळी जोडप्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी स्टेज वर गर्दी लावली होती.

वाटलं नव्हतं होईल पण, आज खूप आनंद होतोय...

नवरदेव प्रतिक याने सांगितल्याप्रमाणे, तो म्हणतोय की आमची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली, त्यानंतर आम्ही दोघे भेटलो. पण तेव्हा वाटलं नव्हतं आमचं लग्न होईल. परंतु ते म्हणतात ना, लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जात असतात, त्याचप्रमाणे देवाने बनवलेली जोडी आणि आई-वडिलांचे आशीर्वादाने आज आमचं लग्न थाटात झालं. आज खूप आनंद होत आहे की उंची प्रमाणे बायको भेटल्याचा. हसत खेळत पुढचा आयुष्य आम्ही एकमेकांसोबत घालवणार असल्याचे प्रतिक म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT