Hospital photo of Sadavarte circulating on social media is AI-generated and misleading; he was not present during the ST Bank meeting incident. Saam Tv
महाराष्ट्र

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

Gunratna Sadavarte Viral Hospital Photo: गुणरत्न सदावर्तेंना बेदम मारहाण झालीय आणि त्यांना फ्रॅक्चर झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलंय...हे आम्ही म्हणत नाहीये, तर सदावर्तेंना मारहाण झाल्याचा फोटो व्हायरल होतोय...त्यामुळे आम्ही या फोटोची पडताळणी केली...

Sandeep Chavan

...हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले हे आहेत वकील सदावर्ते...सदावर्तेंच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झाल्याचं दिसतंय...त्यांच्या चेहऱ्यावरही काही जखमा दिसतायत...एसटी बँकेच्या राड्यावेळी सदावर्तेंना बेदम मारहाण केल्याने त्यांची ही अवस्था झाल्याचा दावा करण्यात आलाय...हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय...आणि मेसेजही व्हायरल केला जातोय...

...हा फोटो निरखून पाहा...हॉस्पिटलमध्ये सदावर्ते बेडवर झोपलेयत...त्यांच्या चेहऱ्याला बँडेज पट्ट्या लावल्यायत...तर हाताला आणि पायाला प्लास्टर करण्यात आलंय...आणि दुसऱ्या फोटोमध्ये सदावर्तेंची पत्नी जयश्री या त्यांना धीर देत असताना फोटोत दिसतंय...सदावर्तेंना एसटी बँकेच्या बैठकीत बेदम मारण्यात आल्याचा दावा करण्यात आला...बघता बघता हे फोटो अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचले...काहींनी फोटो स्टेटसला ठेवून हल्ल्याचा निषेधही केला...तर काहींनी सदावर्तेंना केलेली मारहाण योग्यच असल्याचाही दावा केला...त्यामुळे या फोटोचं सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने थेट सदावर्तेंचीच भेट घेतली...आणि त्यांच्याकडून सत्य परिस्थिती जाणून घेतली...

ST बँकेच्या बैठकीवेळी सदावर्ते हजरच नव्हते

गुणरत्न सदावर्तेंना मारहाण झालेली नाही

हॉस्पिटलमधील फोटो AIच्या माध्यमातून बनवलेत

AIच्या माध्यमातून फोटो बनवून दिशाभूल

सदावर्ते राड्यावेळी उपस्थित नव्हते...त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...त्यामुळे तुम्हालाही असे कुणाचे फोटो आल्यास त्याची शहानिशा केल्याशिवाय शेअर करू नका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 20 वर्षानंतरच घेता येणार VRS; सरकारकडून नवी गाइडलाइन जारी

Parth Pawar Pune Land Scam Case: पुण्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किनसाठी लावा 2 मिनटात तयार होणारा 'हा' हॉममेड फेस मास्क

Women’s World Cup 2025: महिला वर्ल्ड कप विजेत्या टीमला टाटा मोटर्सकडून मोठ्ठं गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार नवी Tata Sierra SUV

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

SCROLL FOR NEXT