Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : राज्यात दीड कोटी लाडक्या अपात्र? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Ladki Bahin Yojana update : राज्यातील दीड कोटी लाडक्या बहिणी अपात्र झाल्यायत...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...सांगलीत 25 टक्के लाडकींचा अर्ज बाद झाल्याचाही दावा केलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर आताच तुमचं खातं तपासा...कारण, दीड कोटी लाडक्यांचे अर्ज अपात्र झाले असून, हप्ते थांबवल्याचा दावा करण्यात आलाय...या मेसेजमुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालाय...खरंच एवढ्या मोठ्या संख्येनं लाडकीचा लाभ थांबवलाय का...? अचानक एवढ्या लाडक्या अपात्र कशा काय झाल्या...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत...मात्र, मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज काय?

लाडकीचे लाभार्थी सुरूवातीला 2.63 कोटी होते. सध्या पोर्टलवर ही संख्या अवघी 1 कोटी 6 लाख दिसतेय. दीड कोटी लाभार्थी कुठे गेल्या? सध्या सांगलीत सव्वा 7 लाख लाडकी लाभार्थी होत्या. त्यातील 25% एका जिल्ह्यात कमी झाले.

हा दावा सांगली जिल्ह्यातला आहे...सांगलीत तब्बल 25 टक्के पात्र लाडक्यांचा हप्ता बंद केल्याचा दावा केलाय...मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? खरंच राज्यभरात दीड कोटी अपात्र झाल्यायत का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्यासाठी अधिकृत माहिती या खात्याच्या मंत्री तटकरेंकडूनच मिळू शकते...आमच्या प्रतिनिधींनी आदिती तटकरेंची भेट घेऊन याबाबत माहिती जाणून घेतली.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

साम इन्व्हिस्टिगेशन

दीड कोटी लाडकी अपात्र हा दावा चुकीचा

कुठल्या तरी एका पोर्टलने चुकीची बातमी दिली

2 कोटी 63 लाख ही नोंदणीची आकडेवारी

लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 30 लाखांपेक्षा अधिक

2 कोटी 30 लाखांपेक्षा संख्या कमी झालेली नाही

पोर्टरवरील माहिती ही गेल्यावर्षीची असल्याचं आदिती तटकरेंनी स्पष्ट केलंय...मात्र, सध्या या लाभार्थी 2 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती दिलीय...पडताळणीत काही त्रुटी आढळलेल्यांना अपात्र केलंय...मात्र, कुठेही लाभार्थी कमी केले नसून, आमच्या पडताळणीत दीड कोटी लाडकी अपात्र झाल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NAM vs SA: OMG! इंटरनेशनॅल क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर; शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नामिबियाने दक्षिण आफ्रिकेला हरवलं

Maharashtra Live News Update : अजित पवार यांच्याकडून PDDC बँकेची पाहणी

Dharashiv : शेती वाहुन गेली, पिक मातीमोल झाल; जिवापाड जपलेली जनावर विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

भाजपकडून शिंदे अन् अजित पवार गटाला धक्का, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत बड्या नेत्यांची एन्ट्री

Punha Shivaji Raje Bhosale: महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या...; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'मध्ये उलगडणार बळीराजाची व्यथा

SCROLL FOR NEXT