Nandurbar Viral CCTV Footage Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : मित्रच निघाला चोर! व्यापाराच्या दुकानात बसायचा, संधी साधून पैसे खिशात टाकायचा, धक्कादायक प्रकार उघड

Nandurbar Viral CCTV Footage : नंदुरबार जिल्ह्यात खत व बियाणे दुकानातील गल्ल्यातून रोज पैसे चोरी होत असल्याचा प्रकार सीसीटीव्हीतून उघड झाला. व्यापाऱ्याच्या मित्राविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • नंदुरबारमध्ये मित्राकडूनच विश्वासघात

  • सीसीटीव्हीत नियमित चोरी स्पष्ट

  • खत व बियाणे दुकानातील गल्ल्यातून पैसे लंपास

  • विसरवाडी पोलिसांकडून आरोपी ताब्यात

सागर निकवडे, नंदुरबार

नंदुरबारमध्ये मित्रानेच मित्राचा विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात जितू परदेशी यांच्या मालिकेची खत व बियाणे विक्रीची दुकान असून दुकानाच्या गल्ल्यातून पैसे दररोज चोरले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर व्यापाऱ्याला धक्का बसला. ही चोरी व्यापाऱ्याच्या जवळच्या मित्राने केल्याचं समोर आलं. याप्रकरणी संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात जितू परदेशी यांच्या मालिकेची खत व बियाणे विक्रीची दुकान आहे. जितू परदेशी यांनी आपल्या दुकानात दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते. गेल्या काही दिवसांपासून गल्ल्यातील रकमेतील फरक जाणवत असल्याने व्यापाऱ्याच्या मनात संशय निर्माण झाला. त्यांनी फुटेज तपासले असता त्यांना अक्षरशः धक्का बसला. दुकानात नेहमी येणारा त्यांचाच मित्र अनिल शर्मा गल्ल्याजवळील खुर्चीवर बसून व्यापाऱ्याची नजर चुकवून हळूच गल्ल्यात हात घालतो आणि नोटा खिशात टाकतो, हे वारंवार दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेजनुसार ही चोरी एक दिवसाची किंवा योगायोगाने झालेली नाही, तर ‘नियमित’ कृती असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हिडीओमध्ये चित्रित झाल्याप्रमाणे, अनिल शर्मा ठराविक वेळेला दुकानात येतो. गल्ल्याजवळ आरामात बसतो, व्यापारी इतर कामात गुंग झाला की गल्ल्याकडे हात वळवतो, आणि सहजपणे गल्ल्यातील नोटा स्वतःच्या खिशात टाकतो. अतिविश्वास आणि जवळच्या नात्याचा गैरफायदा घेत केलेल्या या कृतीने व्यापाऱ्याला मानसिक धक्का बसला आहे.

सध्या हा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणात जितू सुरेश परदेशी खांडबारा यांच्या फिर्यादीवरून अनिल रंजनलाल शर्मा खांडबारा यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT